पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० १० सार्वजनिक धर्मकृत्यें. २८३ रावरून व देशरिवाजावरून झाला पाहिजे. गिरिधारिदास वि० नंदकिशोरदास, मू० इं०अ०व्हा० ११ पृ० ४०५. याचप्रमाणे राजा मुत्तुरामलिंग सेतुपति वि० पेरिय- नायग पिले, ला० रि० इं० अ० व्हा० १ पृ० २०९ यामध्येही महंतांच्या संबंधी देशचालीवरूनच फैसल्ला करावा असे ठरलें. (२.) काशी येथें श्रीकेदारेश्वराचें मंदिर व त्यासंबंधी एक मठ व सत्र अशीं आहेत. ती मुख्य गादी असे ठरून मद्रास इलाक्यांतील जिल्हा तंजावर यामध्ये ति पैंतल येथील मठ हा त्याच्या पोटांतील असें ठरल्यावरून काशीची वहिवाट तिर्पतल येथील मठाधिकाऱ्यानें मागितली होती ती कोर्टानें दिली नाहीं. काशीबशा राम- लिंगस्वामी वि० चितंबरनाथ कुमारस्वामी, स० वी० रि० व्हा० २० पृ० २१७. इं० ला० रि० १० मुं० ४६३ पहा. (३.) महंताचें येणें चेल्यानें वसूल करावें, गुरुबंधूनें करूं नये. दुखराम भारती वि०. लच्छमनभारती, इं० ला० रि० क० वा० ४ पृ० ९५४. (४.) महंताची नेमणूक ही, जर मठाविषयीं बेहडे व स्थापनेचे कागदपत्र अथवा सनदा नसतील, अथवा असून त्यांत कांहीं याबाबद उल्लेख नसेल, तर देशचालीप्रमाणें होते असे पूर्वी ठराव नमूद केले आहेत. त्याचप्रमाणें सीताप्रसाद वि० ठाकूरदास (इं० ला० रि० क० ५ पृ० ७३) यांतही कथन आहे. ह्यांत ( १ ) मौरुसी, ( २ ) पंचाइती, व (३) हकीमी असे मठांचे तीन वर्ग सांगितलेले आहेत; आणखी असे सांगितलेलें आहे कीं, मठासंबंधीं दावा करणार हा संजोगी (ह्म० उत्तम योगी) आहे की वाईट चालीचा ह्मणून हुद्यास अयोग्य आहे, याचा निर्णय करणें हें दिवाणी कोर्टाचें काम आहे. पुजारी. (१.) पुजेचा व उत्पन्नाचा हक्क : - मी पुजारी आहें व माझा हक्क पूजा करून उत्पन्न घेण्याचा आहे असा दावा चालतो. प्राणशंकर व दुसरे वि० प्राणनाथ, मुं० हा० रि० वा० १ पृ० १२. इं० ला० रि० १३ मुं० ५५०. (२.) पुजाऱ्याची नेमणूक. हें स्थावर आहे व ही मागण्याच्या दाव्यास १२ वर्षीची मुदत आहे. ठाण्याचे कलेकटर वि० हरि सीताराम व दुसरा (इं० ला० रि० मुं० वा० ६ पृ०१४६. इं० ला० रि० ८ मुं० ४५५ व १० मुं० १५१ पहा. टीप:- याचविषयीं कृष्णभट वि० कपाभट, मुं० हा० रि० वा० ६ पृ० १३७, इं० ला० रि० २ मुं० १२६; १ मुं० ३२७; ६ मुं० ११४; ६ मुं० १५३; ला० रि० १ इं०अ० ३४ ; इं० ला० रि० १० क० ७३; व बळवंतराव वि० पुरुषोत्तम, मुं० हा० रि० वा० ९ पृ० ९९ हे पाहावे; दुसऱ्या (९ कलमांतील) कज्जांतील तंटा जोशीपणाबद्दल होता. इं० ला० रि० २ मुं० १२६; ९ मुं० ३२७; १० मुं० ४८७. ( ३. ) विकरी: - उपाध्याचा हुद्दा कुटुंबांतल्या कुटुंबांत विकतां येतो. सीताराम