पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८२ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० १० पंथाच्या जातीच्या इस्टेटाचा होता. असा दावा कलकत्ता एथें हायकोर्टात आणण्यास आड्वो- केट जनरल यास पक्षकार करण्याचें कारण नाहीं असें ठरलें. ई० ला ० रि० ८ मुं० ४९२पहा. (६.) अशा देणगीची अफरातफर झाल्यास मयताच्या वारसांस दावा आणतां येतो; परंतु स्पष्ट अफरातफर झाली आहे असे फिर्यादीत अस्तिपक्षाचें दृढ कथन असून, प्रतिवादींच्या खर्चाचा जामीन दिला पाहिजे. बृजमोहनदास वि० हरोलालदास, इं० ला०रि० क० वा० ५ पृ० ७००. सिवाइत् ( सिवाइत अथवा पुजारी ). (१.) देवालयाकरितां जेथें जंमीन दिलेली आहे तेथें ती जमीन त्या देवाच्या शि- वाइतास (ह्मणजे पुजाऱ्यास ) निरंतरच्या साऱ्यानें कोणासही देतां येत नाहीं; कारण ती जमीन देवाच्या सेवेकरितां मूळची दिलेली आहे. तिची वहिवाट करण्याचा मात्र पुजा- याचा हक्क आहे. सदहू जमिनीवरील स्वत्व त्यास कोणासही देतां येत नाहीं. महाराणी शिवसौ देविया वि० मथुरानाथ आजारजी मू० ई० अ० व्हा० १३ पृ०२७०. (२.) देवाकरितां दिलेली मिळकत जरी सिवाइत कोणास देऊं शकत नाहीं, तरी अज्ञान वारसाच्या वहिवाटदाराप्रमाणें त्यासारखाच त्यास अधिकार आहे; ह्मणून जेथें कपट नसेल, आणि योग्य देवसेवेकरितां, अथवा देवालय दुरुस्त करण्यास, अथवा देवस्थानाची दुसरी मालमिळकत नीट करण्यास, अथवा देवस्थानावर कोणी कज्जे उत्पन्न केल्यास ते भां- डण्यास, आणि या प्रकारच्या दुसऱ्या कारणांकरितां कर्ज करण्यास त्यास अधिकार आहे. आणि त्यावर जे निवाडे झाले असतील ते नंतरच्या सिवाइताविरुद्ध कायम राहतील. प्रसन्न कुमारि देबिया व दुसरा वि० गुलाबचंद बाबू, ला०रि० ई० अ० व्हा० २ पृ० १४९.ई० ला०रि० २ क ० ३५२. परंतु इं० ला०रि० ५ मुं० ३९६: ६ मुं० ५५२; ८ मुं० ४६५, ४६७; १७ क० १६०; ९ म० ८२ पहा. (३.) वरील कज्याप्रमाणेंच देवालय दुरुस्त करण्याकरितां व देवाकरितां दुसऱ्या कांहीं गोष्टींसाठी कर्ज काढून सिवाइतानें जमीन विकली. ती विक्री कोर्टानें कायम ठेविली. कुंवर दुर्गानाथ राय वि० रामचंद्रसेन, ला० रि० ई० अ० व्हा० ४ पृ० ५२. टीप - मुंबईकडे ह्याविषयीं कसा पाठ आहे तें नारायण वि० चिंतामण (इं० ला०रि० मुं० वा० ५ पृ० ३९) व लोटलीकर वि० वागळे, (इं० ला०रि० मुं० वा० ६ पृ० १९६) यांतील ठराव पाहिल्यानें समजेल. इं० ला०रि०६ मुं० ५५२; ८ मुं० ४९०; १५मुं०६३१-७ महंत (१.) महंत व त्यांचे हुद्दे व त्यांचीं कृत्यें, यांविषयीं निर्णय करणें तर तो आचा-