पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० १ धकार झाले, त्यांचें फारं महात्म्य आहे. त्यांत कमलाकर प्रमुख आहेत. त्यांच्या ग्रंथांतून एका निर्णयसिंधूंत त्यांनीं १३ श्रौत ग्रंथ. १३१ स्मृति. ६८ पुराणे. २९६ निबंधादि अन्य ग्रंथ. २० तथापि मिळून १०८ ग्रंथांचे आधार गृहीत आहेत. तसेच दुसरे शंकरभट्ट द्वैत- निर्णय कर्ते व त्यांचे परम प्रसिद्ध पुत्र • नीलकंठभट्ट ह्यांचे १२ मयूख फार प्रसिद्ध आहेत; त्यांतून व्यवहारमयूख हा सहावा. ह्यांचा इतिहास कैलासवासी बाळशास्त्री रानडे, आणि आमचे गुरू राजाराम शास्त्री बोडस ह्यांच्या साहाय्याने प्रसिद्ध, केला आहे. २३ २२ २३ तथापि ह्या इलाख्यांत माहीत असलेल्या ग्रंथांच्या बलावलाविषयीं हायकोर्टाने असे ठरविले आहे कीं, मनु, मिताक्षरा, व व्यवहारमयूख असा क्रम धरावयाचा. मुंबई बेट व गुजराथ ह्यांत मयूखास मनूनंतर प्राधान्य दिलेलें आहे. परंतु वादग्रस्त प्रश्नासंबंधी महाराष्ट्र देशांत मयूखाच्या अनुरोधानें विचार केला असतां चालेल असेंही ठरलेलें आहे. रत्नागिरी जिल्ह्यांत मिताक्षरा प्रमाणभूत आहे, मयूख नन्हे ठरले आहे. २४; २५ ( १७.) सांप्रत मुख्य न्यायाधीश धर्मशास्त्राच्या आधारानं जे ठराव करतात, ते. ठराव त्या त्या बाबतींचें एका जातीचें शास्त्रच असें मानितात. ते रद्द होत तों, त्यां- प्रमाणे कज्जांचा फडशा होतो. इंग्लंडामध्ये प्रिवी कौन्सिल ह्मणून एक वरिष्ठ कोर्ट आहे; तेथे या देशांतील सर्व मुख्य कोर्टाच्या निवाड्यांवर अपील चालतें. त्या. कोर्टाचा निवाडा झाला ह्यणजे तो शेवटला निर्णय असे समजतात. तेही निवाडे, केव्हां केव्हां फिरतात, अथवा त्यांचे अर्थ व त्यांची व्यापकता ह्यांची प्रसंगवशात् नि- रनिराळी व्याख्या होते. त्याखाली येथील हायकोर्ट व माजी सदर दिवाणी अदालत . यांचे निवाडे. बंगाल, मद्रास, अलाहाबाद येथील हायकोडतांच्या निवाड्यांसही योग्य ठिकाणी मान देतात. २०. विशेष विस्तार इंग्रजी ग्रंथाची प्रस्तावना पृष्ठे ६२-६६ पहा. २१. पाहा याज्ञवल्क्य स्मृत्युपेत व्यवहारमयूख याची प्रस्तावना. २२. मुरारजी गोकुळदास वि० पार्वतीबाई इं० ला० रि० १ मुं० १७७. २३. सखाराम वि० सीताबाई इं० ला० रि० ३ मुं० ३५३. २४. भागीरथीबाई. वि० कान्होजीराव इं० ला रि० ११ मुं० २८५. २५. बाळकृष्ण वि० लक्ष्मण जानकीबाई वि० सुंद्रा इं० ला० रि० १४ मुं० ६०५-६१२. •