पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० १० सार्वजनिक धर्मकृत्यें. २८१ 19 ( ४.) दवाखाना व शाळा ह्यांकरितां एकानें १,१०, ०००, रुपये मृत्युपत्रांत देण्याचे ठरविलें. तो उत्सर्ग कोर्टानें कायम करून, त्याची व्यवस्था विधवेनें “ ट्रस्टी ह्मणून करावी असा हुकूम केला. हरिदासी देवी वि० सेक्रेटरी आफू स्टेट फार इंडिया इन् कौन्सिल इं० ला० रि० क० ९ पृ० २२८. देवत्रा ह्मणजे देवस्व. ( बंगाल्यात देवतर, देवोतर, ह्मणतात. ) ( १. ) कांहीं लेख करून जेथें देवाकरितां कांहीं मिळकत ठेविलेली असेल तेथें ती मिळ- कत देवाकरितां आहे आणि तिजा उद्देश देवसेवा कुटुंबांत चालावी आणि उत्सर्ग करणाराचे वारस हे वंशपरंपरेनें त्या मिळकतीचे ट्रस्टी ह्मणजे हमीदार मोजावे अर्से ठरले आहे. राजा चंदरनाथ राय वि० कुमार गोविंदराय बंगाल ला० रि० व्हा० ११ पृ० ८६. ( २ . ) जेथें योग्य उत्सर्ग झाला नसून, फक्त देवाच्या नांवानें इष्टेट खरेदी मात्र झालें आहे, परंतु जेथें पुजाऱ्यांची नेमणूक नाहीं किंवा कोणा ब्राह्मणास अग्रहार करून दिलेला नाहीं आणि मालकानें आपल्या सत्तेचा उत्सर्ग केला नाहीं, तेथें ती मिळकत त्याचीच आहे असे समजलें पाहिजे ह्मणून त्याचें योग्य कर्ज वारण्याकरितां ती त्याच्या विध- वेस विकतां येईल. महाराणी बृजसुंदरी देबिया वि० राणीलचमी कुमारी, स० वी० रि० वा० २० पृ० ९५, प्रिवी कौन्सिल. ( ३. ) एका बाईनें बंगाल प्रांतांत हुगली जिल्ह्यांत कांहीं इस्टेट विकत घेऊन आ- पल्या घरांतील देव राजराजेश्वर याच्या पूजेकरितां, व अन्य पूजा, श्राद्धे, व दुसऱ्या धर्मसंबंधी क्रिया करण्याकरितां जमीन ठेविली. त्याबाबत असा ठराव झाला कीं, बाईंच्या मृत्युपत्रांतील मिळकत ही सर्वच देवस्व आहे असे मोजतां येणार नाही, परंतु त्यांतील लिहिलेल्या क्रिया केल्यानंतर बाकीची जी मिळकत राहील ती त्या एकत्र कुटुंबांतील लोकांची आहे. अशुतोष दत्त वि० दुर्गाचरण चतर्जी ला० रि० इं० अ० व्हा० ६ पृ० १८२. इं० ला० रि० ७ मुं० १३९; इं० ला० रि० ७ अ० ११९; ९ मुं० १७१; ६ क० १९८; ७ क० २७८; १४ क० १२५; १६ क० १०९ पहा. ( ४. ) याचप्रमाणे, राम कुमार पौल वि० जोगेन्द्र नाथ पौल, इं० ला० रि० क० ४, पृ० १६, याही कज्जांत ठराव झाला कीं, जी मिळकत देवाकडे स्पष्ट उत्स- र्गानें दिलेली असेल तिचें वांटप व्हावयाचें नाहीं, बाकीचीचें होईल. ० ( ५. ) देवत्रा देणगी कोणती आणि सार्वजनिक परंतु जातीच्या उद्देशानें देणगी कोणती, याविषयीं कांहीं माहिती पंचकौरी मल्ल वि० चौथामल, (इं० ला० रि० क० वा० ३ पृ० १६३) ह्या कज्यांत मिळेल. तो दावा दिगंबर जैनांच्या एका