पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८० हिंदुधर्मशास्त्र. प्र० १० मध्यें होता, तरी त्यांत धर्म व धर्मादाय, ह्या हिंदु शब्दांचा अर्थ केलेला आहे; कारण खो- जांत ज्या विषयासंबंधी निराळी चाल नसेल तेथें हिंदूचें धर्मशास्त्रच लागू होतें. “चारिटी " ह्या इंग्लिश शब्दाच्यापेक्षां " धर्म " या शब्दाची व्यापकता मोठी आहे असे कोर्टानें ठरविलें. आतां खोजांच्याकरितां नवीन कायदा होण्याची वाटाघाट चालू आहे. ( देवत्रा ह्या सदराखाली पाहावें ). ( २. ) याचप्रमाणे एका गृहस्थानें मृत्युपत्रांत लिहिलें कीं, माझ्या द्रव्यांतून वहिवाटदारानें योग्य दिसेल त्याप्रमाणे स्मशानासाठीं घाट व देवालयें बांधून, प्रत्यहीं देवसेवा करण्याची व्यवस्था करावी, आणि बाकी द्रव्य योग्य फायदा होई असे वापरावें. व्यवस्था करणार ( ज्याचें नांव मृत्युपत्रांत होतें ) त्यानें सर्टिफिकीट घेत नाहीं ह्मणून सांगितलें. नंतर वारसाच्या दाव्यावरून वरील देणगी [ उत्सर्ग बरोबर नाहीं ह्मणून ] मोघम असे ठरून फुकट गेली. सर्वमंगला देवी वि० महेंद्रनाथ, इं० ला० रि० क० वा० ४, पृ० १०८. ( ३. ) कुलदेवतेच्या पूजेच्या उत्पन्नांतून, गोपीनाथजी येथील खरोखर गरीब असतील त्यांस अन्न द्यावें; पूर्वजांची श्राद्धे करावीं; गरिबांस अन्न द्यावें; दुर्गापूजा [ शारदी नवरात्रांत सरस्वतीअनाध्यायाच्या वेळीं ] जे विद्वान् ब्राह्मण व पंडित "टोले" झणजे पाठशाळा घालून विद्यार्थ्यांस पढवितात, त्यांस देणग्या द्याव्या; महाभारत व पुराणें वाचवावीं, व कार्तिकमासांत देवसेवा करवावी. " बाकी कांहीं राहिल्यास माझ्या जातीच्या गरिबांच्या मुलींच्या व गरीब ब्राह्मणांच्या मुलींच्या लग्नास मदत करावी, आणि माझ्या जातीच्या, गरिबांच्या व गरीब ब्राह्मणांच्या, व दुसन्या संभावीत जातीच्या गरिबांच्या मुलांच्या विद्याभ्यासास योग्य वाटेल तशी मदत करावी." ह्यांत " बाकी कांहीं राहिल्यास " इ० ह्या शब्दांवरून असें ठरलें कीं, ह्या देणग्यांतून जित- क्यांच्या रकमा ठरविण्यांत येतील त्या कायम आहेत; व बाकी सर्व रकम इस्टेटीच्या " राहिलेल्या " भागांत मोजली जाईल. द्वारकानाथ बैसाख वि० बरोदाप्रसाद बैसाख इं० ला०. रि० क० वा० ४ पृ० ४४३. इं० ला० रि० ६ मुं० २५; १४ मुं० १० पहा. टीप — ज्यास खरोखर धर्म करणें आहे त्यानें हयातीत करावा हा उत्तम पक्ष. तो, अनुकूल नसेल तर असे ठराव पाहून योग्य सलाह घेऊन तरी करावा. पुढील कज्जे उत्सर्गाच्या स्वरूपाचें ज्ञान होण्यास उपयोगी पडतील - राजेन्द्रदत्त वि० शामचंद- मित्र इं० ला० रि० क० वा० ६, पृ० १०६. इं० ला० रि० ७ मुं० १३९. परंतु १४ क० ५२५ पहा. 2