पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मश | स्त्र. • प्र० १० उत्सर्गपद्धति — रामेश्वरभट्टसूरीचे चिरंजीव भट्टनारायण यांनी केलेला (ह्यांत तलाव, विहिरी, हौद, बगीचे, वृक्ष वगैरेच्या उत्सर्गाविषयी विवेचन केले आहे; व बनारस एथील भट्टांनीं केलेल्या सर्व ग्रंथांत हा जुना आहे. ( डा० राजेन्द्रलालचा " क्याटलागू " वा० ५ ८० १४६ पहा). 66 सार्वदैविकी प्रतिष्ठा – कृष्णमित्राचे शिष्य यतिप्रज्ञामित्रकृत. २७६ प्रासादशिवाद्याचार प्रतिष्ठा - नारायणभटांचे चिरंजीव शंकरभट्ट यानें केलेला; व तो धर्मद्वैतनिर्णय नामक ग्रंथांतून संक्षेपानें उतरलेला आहे. नूतन मूत्तिप्रतिष्ठाप्रयोग – हा ग्रन्थ भट्टनारायणानें आश्वलायनकृत गृह्यपरिशि- ष्टाच्या आधाराने केलेला आहे. 66 (११६.) पश्चिम हिंदुस्थानांन प्रतिष्ठा, अर्चा, व तत्संबंधी दुसरे विधि करतेवेळी ह्या वरील सर्व ग्रंथांचा उपयोग करितात. वरील प्रकरण जेव्हां प्रथम इंग्रेजीत लिहिले तेव्हां जे अन्य लहानलहान ग्रंथ यासंबंधी मिळविले होते त्यांची नांवें मीं एथें लिहीत नाहीं. डाक्टर राजेन्द्रलाल मित्र ( ज्यानें आपणास आर्यलोकांच्या ग्रन्थासंबंधी अति उपयुक्त माहिती दिली आहे ह्मणून त्याचें हिंदुस्थान ऋणी आहे, ) त्याने आपल्या संस्कृ पुस्तकांच्या सूचीच्या यादी छापल्या आहेतु, व त्या सूचीच्या दुसऱ्या व्हाल्युमामध्यें या विषयासंबंधी एका अति जुनाट ग्रंथाचा वृत्तांत दिला आहे तो चमत्कारिक आहे ह्मणून मी एथें भाषान्तरानें उतरून घेतला आहे. या ग्रंथाचें नांव मयमत, ऊर्फ मयशिल्प, ऊर्फ प्रतिष्ठातंत्र हे आहे. हा ग्रंथ शिल्पशास्त्रावर आहे. युधिष्ठि राचा राजवाडा बांधणाऱ्या मयनामक दानवाच्या नियमाच्या आधारानें हा ग्रंथ रचलेला आहे, असें ह्मटलें आहे. तान्त्रिक ह्मणून लिहिण्याची एक रीति आहे त्या रीतीनें हा ग्रंथ लिहिलेला आहे, व तो अनुष्टुप् श्लोकांनीं बद्ध आहे. परंतु तो ग्रंथ इतक्या मितभाषेत लिहिलेला आहे व त्यांतील परिभाषा व पदें इतकीं क्लिष्ट आहेत की कांहीं कांहीं ठिकाणीं तो ग्रंथ मुळींच समजत नाहीं. ग्रंथकर्त्याचें नांव दिलेलें नाहीं व ग्रंथ अपुरा आहे असे सरत्याशेवटच्या ओवीवरून व सरत्याशेवटच्या पत्रावरील लेखावरून समजतें. परंतु अर्से जरी आहे तथापि शिल्पशास्त्रावर ग्रंथ ह्याच्याइतका पूर्ण दुसरा को- णताही संस्कृतभाषेत लिहिलेला आढळला नाहीं; व डा० ए० सी० बर्नेल यानें मजकरितां तो तंजोरच्या राजाच्या पुस्तकग्रहांतून मिळविला ह्मणून मी त्याचा अति आभारी आहें." " मानसार नामक ग्रंथापेक्षां ह्या ग्रंथांत धर्मसंबंधी विधींवर व ज्योतिषांतील विष- यांवर अगदी थोडें विवेचन केलेले आहे. त्यांतील विषयांची अनुक्रमणिका पुढे लि-