पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० १०. सार्वजनिक धर्मकृत्यें. असें पूर्वीच मी सांगितलें आहे. अशा कामी सर्वांस मदत व्हावी आणि ह्मणून वरील थोडीशी माहिती मी दिली आहे. वर लिहिलेल्या ग्रंथांशिवाय दुसरे ह्या विषयावर पुष्कळ ग्रंथ प्रसिद्ध थोड्यांची नांवें पुढें देतों :- आहेत. त्यांतून - पूर्त्तप्रकाश – हा ग्रंथ, प्रतिष्ठान (पैठण) एथें राहणारे नारायण तोरो यांचे चिरं- जीव रुद्रदेव यांनी केलेल्या प्रतापनरसिंह नामक ग्रंथाचा भाग आहे. पूर्त्तकमलाकर – हा ग्रंथ नारायणभट्टांचे चिरंजीव रामकृष्णभट्ट, त्यांचे चिरंजीव कमलाकरभट्ट यांनी केलेला आहे ( डाक्टर राजेन्द्रलालकृत संस्कृत लेखी पोथ्यांचा क्याटलाग " ( वा० ५ १० १३८ ) २७५ तटे कमी व्हावे प्रतिष्ठाहेमाद्रि – हा ग्रंथ श्रीहेमाद्रिकृत आहे व परिशेषखण्ड ( ह्म० चतुर्वर्गचि न्तामणींतील किरकोळ विषयांवरील भाग ) त्यांत याचा संग्रह आहे. प्रतिष्ठादिनकरोद्योत- दिनकरभट्टांचे चिरंजीव गागाभट्ट ऊर्फ विश्वेश्वरभट्ट यांनी केलेला (नववा उद्योत ) प्रतिष्ठापद्धति- - भरद्वाज महादेव यांचे चिरंजीव दिनकर यांनी केलेला. प्रतिष्ठातिलक – ईश्वर व देवी यांच्या संवादरूपानें असून याचे पंधरा पटल आहेत. प्रतिष्ठासारदीपिका – टकले घराण्यांतील चिन्तामणिदीक्षितांचे चिरंजीव रामचंद्र- दीक्षित यांचे चिरंजीव पांडुरंग यांनी केलेला. - प्रतिष्ठाप्रयोग — आपदेवमांचे चिरंजीव वासुदेवभट्ट यांनीं केलेल्या प्रयोगरत्नमा- ला नामक ग्रंथाचा हा भाग आहे. 66 देवस्थापनकौमुदी–बल्लाळसूरीचे चिरंजीव सखारामभट्ट घारे यांनी केलेला. मूर्त्तिप्रतिष्ठा – रघुनाथसूरीचे पुत्र त्रिविक्रमसूरि यांनी केलेला: ( राजेन्द्रलाल यांचा " क्याटलाग वा० ५८० १५१). मूत्तिप्रतिष्ठापद्धतिं – त्रिविक्रमकृत. - प्रासादप्रतिष्ठापद्धति-नरहरिभट्ट पंढरपुरकरकृत. लिङ्गप्रतिष्ठापद्धति – बौधायन व इतर जुने ग्रंथ यांच्या आधारानें केलेला आहे. हा ग्रंथ पटवर्धन घराण्यांतील भट्ट मोरेश्वर यांचे चिरंजीव भट्ट चिन्तामणि यांनी केलेला आहे ( डा० राजेन्द्रलालचा क्याटलाग, वा० १, ४० ६ ). उत्सर्गकौस्तुभ — हा ग्रंथ महाराजाधिराजबाजू बहादूर यांच्या आज्ञेनें आपदेव यांचे चिरंजीव अनन्तदेव यांनीं केलेला आहे; व राजधर्मकौस्तुभ ग्रंथांतील पूर्वपद्धतीच्या दुसऱ्या दीधितीचें पहिलें अर्ध आहे.