पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७४ हिन्दु धर्मशास्त्र. प्र० १० दुरुस्ती केली असेल तो प्रसंग खेरीजकरून, अन्यत्र कोठेही उत्सर्ग करावा असें सां- गितल्याचें आढळत नाहीं. दुरुस्त केलेल्या देवळांविषयीं असे भासतें कीं, जीर्णोद्धार हा बहुधा दुसऱ्याच्या देवळाचा असतो; तेव्हां अर्थात् दुरुस्त करणारा हा त्या देवळाचा मालक नव्हे व ह्मणून त्यानें दुरुस्त केलेल्या देवळावरच्या आपल्या दुरुस्तीपासून उत्पन्न झालेल्या स्वत्वाचा त्याग केला पाहिजे. निर्णयसिंधु व धर्मसिंधु ह्या दोन्ही ग्रंथांत नव्या देवळाचा उत्सर्ग सांगितलेला नसून, उलट उत्सर्गाचा स्पष्टपणें निषेध केलेला आहे. कांही देवळें तर खासगी उपयोगाकरितां स्थापित असतात. दुसरी कांहीं देवळें अशीं आहेत कीं तेथें थोड्या मात्र बाहेरील लोकांस पूजेकरितां येण्याची परवानगी असते. ज्या देवळांची अर्चा वेदोक्तमंत्रांनीं होते व देवांची पूजाही वेदोक्तमंत्रांनीच होते तेथें द्विजांसच मूर्तीपर्यंत जाण्यायेण्याची परवानगी असते. परंतु असें जरी आहे तथापि ह्यासंबंधानेंही देशरिवाजानें कोठें कांहीं फरक पडला आहे; व जेथें देवस्थानें खासगी आहेत, अथवा ज्यांच्या पूजेअर्चेविषयीं जेथें व्यक्त लेख आहेत, ती देवस्थानें खेरीजकरून, अन्यत्र स्थलीं लोकरिवाज कसा आहे ह्याविषयीं नेहमी चौकशी करून त्याप्रमाणे चालले पाहिजे. (५१९.) प्रतिष्ठा व उत्सर्ग ह्या विषयांचाच एक विभाग जीर्णोद्धार हा आहे. जीर्णोद्धार ह्मणजे देवळें, विहिरी, तलाव इत्यादिकांची दुरुस्ती करणे हा होय. हा जीर्णोद्धार करणें तो मूळ स्थापना करणारांनी अथवा त्यांच्या वंशजांनीं होईल तेथपर्यंत करावा. परंतु जेव्हां ते गैरहजर असतील अथवा हजर असूनही जीर्णोद्धार करण्यास असमर्थ असतील तेव्हां त्यांच्या सजातीयांस जीर्णोद्धार करण्याचा अधिकार आहे. परंतु त्यांनीं स्थापना करणारांची अथवा त्यांच्या वारसांची परवानगी घेतली पाहिजे. जेव्हां पर- वानगी घेणे अशक्य असेल तेव्हां ती नाहीं घेतली तरी चालेल. अशा अडचणीच्या वेळीं गांवांतील संभावितांची संमति घेणें हा प्रशस्त मार्ग आहे. असे करण्याचा उद्देश पुढें तंटे पडूं नयेत हा आहे. अशा मोडकळीस आलेल्या देवस्थानांचा व इतर धर्मकृत्यें, धर्मशाळा इत्यादिकांचा जीर्णोद्धार करणें हें लोक मोठें पुण्यप्रद कृत्य मानितात; ह्मणून अशा स्थानांचा जीर्णोद्धार करणें तो तंटेबखेडे न होत अशा रीतीनें करणें तलाव, न हें प्रशस्त आहे. सार्वजनिक धर्मकृत्यांसंबंधीं दावे चालू करतां येण्याच्या अगोदर आइव्होकेट जनरल अथवा दुसरा कोणी सरकारी अधिकारी यानें तसे करण्यास पर- वानगी लेखी दिली पाहिजे असें नवीन सिव्हिल प्रोसिजर कोड यामध्यें ठरविलेले आहे, १५. तृतीय परिच्छेद, पूर्वार्ध, प० ५४० २. १६. तृतीय परिच्छेद, पूर्वार्ध, प० १०६ ४० १.