पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० १०. सार्वजनिक धर्मकृत्यें. २७३ मत्स्यपुराणांत, वृक्ष, आराम, आणि धर्मशाळा यांच्या उत्सर्गाचा विधि सांगितलेला आहे. त्यांत वृक्षादिकांस अलंकृत केले पाहिजे; व चार दिवसपर्यंत होम वगैरे समारंभ केला पाहिजे; एका गाईची पूजा केली पाहिजे; व तीस त्या वृक्षांतून फिर- विली पाहिजे; नंतर उत्सर्ग करून समारंभ नेहमीप्रमाणे पुरा करावा. हड्डीं मत्स्यपुराणांत सांगितलेला काल हमेशा कमी करतात; ह्मणजे कर्म थोड्या वेळांत आ- • टोपतात; परंतु इतर सर्व विधि त्यांत सांगितलेल्या विधीप्रमाणे करितात. वर सांगितलेला उत्सर्ग हा सार्वजनिक उपयोगाकरितां दिलेल्या वस्तुसंबंधी आहे, व ह्यांत कोणा एकाच व्यक्तीस अनुसरून दान होत नाहीं. या ठिकाणीं दानं करणारा दिलेल्या वस्तूवरील आ- पला हक्क संप्रदायांत जो विधि असेल त्या विधीनें सोडून देतो व सर्व विधि पूर्ण करितो. (११३.) देवळांविषय विधींची स्थिति ह्याच्या विरुद्ध आहे, विशेषेकरून नव्या देवळांच्या संबंधानें व जेथें नवीन मूर्तीची प्रतिष्ठा करावयाची असेल तेथें नव्या मूर्तीची स्थापना करण्याच्या संबंधानेंही निराळा आचार आहे. जुन्या देवळांच्या जीर्णोद्धाराच्या वेळीं उत्सर्ग पुन्हा करावा असे कांही सांगतात व कांहीं ह्मणतात की उत्सर्ग करूं नये. (११४.) प्रतिष्ठेविषय (ह्मणजे देवळांत मूर्ति स्थापन करण्याविषयीं) व तिची अर्चा करण्याविषयी सविस्तर विधि पूर्तकमलाकरांत दिलेला आहे, व तो पुराणोक्त आहे; परंतु त्यांतील मंत्र वेदोक्त आहेत. मत्स्यपुराणाच्या आधाराने लिहिलेला विधि करावयास दिवस चांगले कोणते हें दाखविण्यासाठी कल्पतरूंत घेतलेले भविष्यपुराण यांतील उतारे व नारदपंचरात्र, अग्निपुराण, यांचा उल्लेख कमलाकर प्रथम करितो. नंतर होम वगैरे करण्याच्या जागा अग्निपुराण, भविष्यपुराण, मार्कडेयपुराण, व मत्स्यपुराण ह्यांत सां- गितल्याप्रमाणें कराव्या असे सांगतो, व त्यास आधारभूत त्या त्या पुराणांतील वचनेंही देतो. प्रथम मूर्ति, एकं, तीन, पांच, अथवा सात दिवस रात्री पाण्यामध्ये बुडवून ठे- वावी असे सांगितलेले आहे; परंतु केव्हा केव्हां आंत बुडवून लागलीचही बाहेर काढ- तात. त्याला सद्यःपक्षविधि ह्मणतात. देवळ तयार असल्यास हे विधि करावे. देवळांत मूर्ति गर्भागारांत ठेवतात. प्रतिष्ठामयूखांत सांगितलेला मूर्तीची स्थापना करावयाच्या वेळचा संकल्प दोन प्र- कारचा आहेः– ( १ ) एक काम्य, ( २ ) व दुसरा केवळ ईश्वरप्रीत्यर्थ. दोन्हीही प्र- कारांत उत्सर्गाचा समावेश नाहीं. सर्व प्रतिष्ठामयूखांत जेथें जीर्ण देवालयांची वगैरे १४. तिर्चे प्रमाण कसें असावें याविषयीं वगैरे पाहाणें तर वराहमिहिरकृत बृहत्संहिता, अध्याय १६, (. कळकत्याची आवृत्ति ८० ३०६-३१० ) पाहावा. ● .