पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७२ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० १० (१११.) बागा, आराम, आणि वृक्ष ह्यांच्या उत्सर्गाचा विधि, विहिरी, तलाव, व इतर पाण्यांच्या स्थलांच्या उत्सर्गाच्या विधीप्रमाणें मुख्यत्वे आहे. पुढे उत्सर्गमयूखांतून उतारा घेतला आहे:- . “अथारामं प्रतिवक्तुं वृक्षारोपणमुक्तं | भविष्यपुराणे || अश्वत्थमेकंपित्रुमन्दमेकं न्य- ग्रोधमेकंदशतित्तिणीश्च । कपित्थबिल्वामलकत्रयंचपञ्चाम्रवापीनरकंनपश्येत् ॥ ॥ यत्नेनापिचराजेन्द्रपिप्पलारोपणंकुरु । सतुपुत्रसहस्राणामेकवकरिष्यति ॥ कर्तव्यमिति शेषः ॥ भारते। कीर्तिश्चमानुषेलोकेप्रेत्यचैव शुभंफलं । अतीतानागतोचो भौपितृवंशौचभा- रत ॥ तारयेत्वृक्षरोपीचतस्मादृक्षांश्वरोपयेत् || मात्स्ये | पादपानांविधिवक्ष्येतथैवोद्यानभू- मिषु । तडागविधिवत्सर्वमासाद्यजगतीश्वर ॥ अर्थः-

-" भविष्यपुराणांत आरामाविषयीं लिहीत असतां वृक्षारोपणाविषयी लिहितो,

जो एक अश्वत्थ, एक पिचुमन्द, एक न्यग्रोध, दहा तित्तिणी, तीन कपित्थ, व तीन आंवळी, इतक्यांचें आरोपण करतो, व एक विहीर बांधून तिच्या कांठावर पांच आम्र- वृक्ष लावतो, त्यास नरकाचें दर्शन होत नाहीं. पद्मपुराणः- हे राजेन्द्र, प्रयास पडला तरी एका पिंपळाचें आरोपण कर. एक हजार मुलांचें काम तो पिंपळ एकटा करील. 'महाभारतः - हे भारत, जो वृक्षाचें आरोपण करतो, त्यास मृत्युलोको कीर्ति मिळते, पुढील लोकीं चांगले फळ मिळतें, व बापाच्या वंशांत पुढें उत्पन्न होणाऱ्या वंशजांचें व मागील पूर्वजांचें पापापासून मोचन होतें; ह्मणून वृक्ष लावावे. मात्स्ये:– हे जगदीश्वर, बागांतील जमिनींत उत्पन्न होणाऱ्या वृक्षांचा विधि पुढे सांगतों; सर्व विधि तडागांच्या विधीप्रमाणे करावयाचा आहे.". (५१२.) तलाव, विहिरी इत्यादिकांप्रमाणेच वृक्ष आराम ह्यांचाही उत्सर्ग झाला पाहिजे अर्से नीलकण्ठ सांगतो. परंतु तो असेंही सांगतो कीं, कांहीं लोक हें मानीत नाहीत; कारण ते असें ह्मणतात की असे मानण्यास कांहीं आधार नाही. चंडेश्वराच्या लेखाच्या आधारावरून कमलाकर निर्णय वृक्षारोपण अ ऋतूंत करावें असें सांगतो. चयीत । विस्तरस्तुमात्स्योक्तोऽस्मत्कृतजलाशयोत्सर्गविधौ ज्ञेयः । कूपादेरुत्सर्गा करणेदोष उक्तो भविष्ये । सदाजलं पवित्रं स्यादपवित्रमसंस्कृतं । कुशाग्रेणापि राजेन्द्र न स्प्रष्टव्य- मसंस्कृतं । १३. पाहा तृतीय परिच्छेद, पूर्वार्ध, प० ४५, ८० २.