पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७० हिन्दुधर्मशास्त्र. प्र० १० स्नान, पान, अवगाहन (बुडी मारणे, पोहणें ) इत्यादिकेंकडून ह्या जलांत सर्व भूतें रम- माण होवोत, इतकें ह्मणून जल जलांत सोडून, जलमातरांची पूजा करावी.” ह्या मयूखांत धर्मशाळांस विशेष अनुलक्षून कांहीं लिहिलेलें नाहीं. मठाचा उत्सर्ग निरनिराळ्या रीतीनें करतात. मठ हा द्विजांस अथवा यतींस दिला पाहिजे. ज्यास मठ द्यावयाचा तो पुरुष ठरलेला असतो. कोणत्या तरी नियमित उद्देशानें मठ देतात. तलाव व विहिरी ह्यांविषयीं निर्णय मयूखांत स्पष्टपणें आहे. जर मयूखांत सांगितलेला संकल्प कोणी स्वीकृत करील, तर त्याने दिलेल्या वस्तूवरील त्याचें स्वत्व जातें. तो उत्सर्गाविषयीं लेख पुढे लिहिल्याप्रमाणे आहे:- “ ततउत्सर्गः । भ्रमणार्थां गांगुरवेदद्यात् । अन्यत्सर्वं मत्स्यपुराणीयजलोत्सर्गविधि- वत् । इदंचावश्यकम् । योनकामयते शान्ति वापीकूपादिके त्विमां | तन्निष्फलं भवेत्तोय- मुप्तंबीजमिवोखरे || वापीकूपतडागेषु संस्थितं प्रथमं जलं । अपेयं तु भवेत्सर्वं तज्जलंसूतिका समं इतिनिन्दावगमात् । उत्सृष्टं च जलंत्यक्त्वाग्नेयादिपुरोडाशवत्स्वयं नोपयोज्यमिति केचित् । अत्रसर्वप्राणिनां उत्सर्ग उद्देश्यत्वात् स्वस्यापि तदन्तर्गतैर्योगोत एवोद्देश्यत्वा- त्स्वस्य तदभावेन रागवैषम्यात् स्वयमुपयोज्यं इत्यन्ये । एवमारामफलादिष्वपि । इति म विष्योत्तरोक्तो वापीकूपतडागोत्सर्गविधिः" अर्थः - नंतर उत्सर्ग करावा. ज्या गाईकडून तळ्यावाटोळें भ्रमण करविलें असेल ती गाय गुरूस ( आचार्यास ) द्यावी. बाकी सर्व मत्स्यपुराणांत सांगितलेल्या जलो- त्सर्गविधीप्रमाणें करावें; आणि हें अवश्य केलें पाहिजे. जर कोणी वापी, कूप इ- त्यादिकांच्या संबंधानें वरील शान्ति न करील तर रेताड प्रदेशांत पेरलेल्या धान्याप्र- मार्णे तें जल निष्फल होईल. वापीकूपतडागांतले पहिले सर्व जल अपेय आहे. तें जल बाळंतीण स्त्रीप्रमाणें अशुद्ध मानलेले आहे. कांहीं लोक असे ह्मणतात कीं, आ- नेय पुरोडाशाप्रमाणें ह्या उत्सृष्ट जलाचा देणाऱ्याने सर्वथैव त्याग करावा; स्वतः त्याचा कधीं उपयोग करूं नये. दुसरे असें ह्मणतात की, ज्याअर्थी देणाऱ्या सर्व प्राण्यांसाठी जल दिले आहे, व ज्याअर्थी तो देणाराही सर्व प्राण्यांत येतोच, त्याअर्थी त्या जलाचा त्यानेंही उपयोग करावा; तसें जर न करील तर सर्व प्राण्यांसाठीं असा जो त्याचा संकल्प तो नष्ट होईल. हेंच उत्सृष्ट आरामांत उत्पन्न झालेल्या फळांसही लागू आहे. ह्याप्रमाणें भविष्यपुराणांत सांगितलेला वापीकूपतडागांच्या उत्सर्गाचा विधि आहे.” (१०९.) देशरिव(जाप्रमाणें अशीं उत्सृष्ट स्थळे जर नादुरुस्त झाली तर ती देणारानेंच ९. पाहा दानचन्द्रिका, पत्र १९८० १.