पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० १० . सार्वजनिक धर्मकृत्यें. अक्षय्यं पुण्यमुद्दिष्टं तस्य स्वर्गापवर्गदं । सर्वकामसमृद्धोऽसौ देववाद्देवि मोदते ॥ भविष्ये ॥ २६९ प्रतिश्रये सुविस्तीर्ण कारिते सजलेन्धने | दीनानाथजलार्थाय वदकिं न कृतं भवेत् ॥” अर्थः- धर्मशाळादानाविषयी मार्केडेयपुराण:- पांथस्थाकरितां जो कोणी धर्मशाळा बां- घतो, किंवा आपल्या घराचा कांहीं भाग साधूंस देतो, तो त्या कृत्यानें अक्षय पुण्यवान् होतो व त्यास स्वर्गवास व मोक्षप्राप्ति होते. त्याच्या सर्व इच्छा परिपूर्ण होतील व तो स्वर्गात देवाप्रमाणे आनंद भोगील. भविष्यपुराणः - गरीब, अनाथ, व तृषितांकरितां जेव्हां कोणी विस्तीर्ण धर्मशाळा बांधवून त्यांस पा- ण्याची व सर्पणाची सोय करतो तेव्हां मला सांग कीं त्यानें काय केलें नाहीं ? [ दान- चंद्रिका पत्र २९ ८० १]. (१०७.) ह्या धर्मशाळा साधूंकरितां बांधीत असत. वर सांगितलेलीं सर्व धर्मकृत्यें हीं प्राचीन वचनांच्या आधारानें करीत असत, व अद्यापिही हजारों लोक आपआपल्या साम- र्थ्याप्रमाणे करितात. प्रथम कित्येक ठिकाण उत्सर्ग करितात; कित्येक ठिकाणी करीत नाहीत. देवालयांतून मूर्तीच्या प्रतिष्ठा करितात तेथें उत्सर्ग कसा करितात तें थोडक्यांत सांगतों. प्रत्येक विधीचा संकल्प करून, नंतर प्रतिष्ठा होते. जर ईश्वरप्रीत्यर्थ कृत्य असेल, तर तसा संकल्प होतो, व काम्य कर्म असले, तर तशा उद्देशानें संकल्प करितात. धर्म- शाळेचा संकल्प साधारण शब्दांनींच आहे (पाहा दानचन्द्रिका पत्र १९४० १ व २); त्यांत सार्वजनिक उद्देशानें स्थापक हा स्वसत्तेचा उत्सर्ग करीत नाहीं; आणि अशा ठिकाणीं उत्सर्गविधि उत्सर्गमयूखांतही सांगितलेला आढळत नाहीं. परंतु तलाव, विहिरी, आराम, आणि कांहीं वृक्ष यांच्या संबंधी संकल्पावरून अशा स्थलीं संक- ल्पावरून उत्सर्ग होतो असें अनुमान करितां येईल. ह्यावरून संकल्पाचें प्रथम प्रा- धान्य आहे हे सहजच दिसत आहे. (५०८.) तलाव वगैरे यांचा संकल्प उत्सर्गमयूखांत आहे तो पुढे लिहिला आहे:- अत्रविशेषो भविष्ये । सामान्यं सर्वभूतेभ्यो मयादत्तमिदंजलं | रमन्तु सर्वभूतानि स्नानपानावगाहनैः ॥ एवंजलंजलेक्षिप्त्वापूजयेज्जलमातरः । अर्थः " ह्याविषयीं भविष्यपुराणांत विशेष स्पष्टपणे लिहिलेलें आहे [तें असें ]:- 'हें जल सर्व भूतांस सामान्यपणें [ एकाच व्यक्तीस नव्हे असें ] दिलें आहे. ३५ -