पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६८ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० १०.. अग्निहोत्र, तप, सत्य, वेद पाळणे, आतिथ्य करणें, ही सर्व 'इष्ट' होत. एक किंवा तीन अमीत होम देणें व अंतर्वेदीत दान करणें हें 'इष्ट' होय. (१०४.) दानकमलाकर ह्या ग्रंथीं धर्मशाला, मठ, तलाव, आराम ( वृक्षसमूह ', इत्यादि करण्याविषयी पुढील प्रमाणे सांगितलेली आहेत:- मार्कण्डेयपुराणे । कुर्यात्प्रतिश्रयगृहं पथिकानां हितावहम् । अक्षय्यं पुण्यमुद्दिष्टं तस्य स्वर्गापवर्गदम् ।। मठदानं स्कान्दे । कृत्वामठं प्रयत्नेन शयनासनसंयुतम् । पुण्यकाले द्विजेभ्योवा यतिभ्योवा निवेदयेत् || सर्वान्कामानवामोति निष्कामो मोक्षमाप्नुयात् । [ हींच वचनें दानचंद्रिका, पत्र १९, ४० १ यांतही दिलेली आहेत ]. अर्थः- मार्कण्डेयपुराणः–पांथस्थांकरितां धर्मशाळा बांधावी ह्मणजे अक्षय पुण्य लागून स्वर्गवास व मोक्षप्राप्ति होते. मठदानाविषयीं स्कंदपुराण:- ज्यांत निजण्याच्या व बसण्याच्या जागा आहेत असा मठ प्रयत्नानें बांधून चांगला दिवस पाहून ब्राह्मणांस किंवा सन्याशांस तो मठ दान द्यावा. ह्मणजे दात्याच्या सर्व इच्छा परिपूर्ण होतील. तो निरिच्छ असेल तर त्यास मोक्षप्राप्ति होईल. (१०९.) कमलाकरभट्टाचे ग्रंथ विख्यात आहेत. त्यांतील पूर्त कमलाकर या ग्रंथीं उत्सर्ग (ह्मणजे सार्वजनिक उपयोगाकरितां आपल्या उपभोगाचें किंवा सर्वस्वत्वाचें नि- वृत्तिपूर्वक दान करणें ) याचा विधि सांगितलेला आहे. जेथें दानविधि लिहिलेला आहे तेथें दान जलांत द्यावें असें दानकमलाकरांत सांगितलेले आहे, व अन्यत्र प्रयोगांतहि तसेंच आहे. जेथें सन्याशांच्या मठांचा उत्सर्ग करणे असेल तेथें प्रतिग्रहीता नस- ल्यामुळे दानाच्या उदकाचा प्रक्षेपही उदकाने भरलेल्या पात्रांत करावा असे सांगितलेलें असून आचारही तसाच आहे. याज्ञवल्क्यस्मृति, ( अ० १, श्लो० १९८-२१६ ) ह्यांत अशा दानांविषयीं सांगितलेले आहे. त्यांतही श्लोक २०९-१११ ह्यांत सांप्रत प्र- करणाचा विशेष उल्लेख आहे [ पाहा भाग २ ८० २२ ]. (१०६.) दानचंद्रिकेंत, धर्मशाळांचें दान कसे करावें ह्याविषय लिहिलें आहे तें येणेंप्रमाणेः – “ धर्मशालादानं मार्कडेयपुराणे ॥ कुर्यात्प्रतिश्रयगृहं पथिकानांहितावहं । नि- जगेहैकदेशंवा साधूनांयो निवेदयेत् || प्रतिश्रयो धर्मशाला | तथा ॥