पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सार्वजनिक धर्मकृत्यें. शङ्खः । रोगिणां परिचर्याच पूर्तमित्यभिनिर्दिशेत् । व्यासः । पुष्करिण्यस्तथा वाप्यो देवतायतनानिच । अन्नदानमथारामाः पूर्तमित्यभिधीयते ॥ नारदः । ग्रहोपरागे यद्दानं सूर्यसंक्रमणेषुच । द्वादश्यादौतु ग्रद्दानं तदेतत्पूर्तमुच्यते ॥ · प्र० १० . 66 सामवेदोपनिषदि । “ त्रीण्याहुरतिदानानि गावः पृथ्वी सरस्वती । नरकादुद्धरन्त्येव जपवापनदोहनात् || शङ्खः । इष्टिभिः पशुबंधैश्च चातुर्मास्यैर्यजेत्तुयः । अग्निष्टोमादिभिर्यज्ञैर्यजेतच सइष्टवान् ॥ अग्निहोत्रं तपःसत्यं वेदानां चैव पालनं । आतिथ्यं वैश्वदेवंच इष्टमित्यभिधीयते ॥ एकाग्निकादौ यत्कर्म त्रेतायां यच्च हूयते । अन्तर्वेद्यांच यद्दानमिष्टं तदभिधीयते ॥ २६७ अर्थ:- शंख — आजारी प्राण्याची सेवा ही 'पूर्त' ह्मटलेली आहे. व्यास –– पुष्करण्या ( देवालयासन्निध पायऱ्यांची लहान कुंडें ), पायऱ्यांच्या विहिरी, देवालयें, अन्नदान, वृक्षांच्या राई ह्यांस 'पूर्त' असें ह्मणतात. नारद - ग्रहणांत केलेले दान, सूर्याच्या संक्रांतिकालीं केलेलें दान, व द्वा- दशीस वगैरे केलेलें दान ह्यास पूर्त ह्मणतात. सामवेदाच्या उपनिषदांत-गोदान, भूदान, विद्यादान हीं तीन अतिदानें ( उत्तम दानें ) ह्मटलीं आहेत. गोदोहनानें, व पेरल्यानें, व जपानें [ अनुक्रमें ] नरकापासून उद्धार होतो. - आणखी शंख [ह्मणतो] - जो इष्टीनें, किंवा पशुबंधानें, किंवा चातुर्मास्यानें, याग करतो, किंवा अग्निष्टोमादिकांनीं याग करतो तो 'इष्ट' करणारा होय. यावरील टीका:- ॥ यत्क्रतुकर्म तदिष्टं स्यात् । “ऋतुर्यज्ञः कर्मदानं । एकाग्निकर्म हवनं त्रेतायां य- च्च हूयते । अन्तर्वेद्यांच यद्दा नमिष्टं तदभिधीयतइति मनुः” । एकम् । खातं वापीकूपादि । आदिना देवालयादि यत्कर्म तत्पूर्त स्यात् एकम् । “पुष्करिण्य: सभावापीदेवता यतना- निच | आरामश्च विशेषेण पूर्तं कर्म विनिर्दिशेदितिस्मृति:" [ मुंबईची आवृत्ति, शा० श० १७९९. ८० १७२ पाहा. ]