पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६६ हिन्दुधर्मशास्त्र. • प्र० १० (५००.) तसेंच देणग्या कोणास द्याव्या ह्याविषयीं ते निवडणूक फारच प्रशंसनीय री- तीनें करीत असत. अशा देणग्या देण्याचा उद्देश, परोपकार व त्यापासून मिळणारें जे पुण्य हाच होता असे दिसतें. ह्याविषयीं लोकांचा समज कसा होता है पुढील श्लो- कावरून कांहीसे दिसून येतें:- " अष्टादशपुराणानांसारंसारंसमुद्धृतम् । परोपकारःपु- ण्यायपापायपरपीडनम् ॥ " [ अर्थ - परोपकारापासून पुण्य लागते; व परपीडनानें पाप लागते; हेंच अठरा पुराणांच्या साराचें सार आहे. ] (१०१.) वर लिहिलेल्या सारख्या दानधर्माच्या कृत्यांस पूर्त्त अशी संज्ञा देतात; व कांहीं अतिशय जुन्या ग्रंथांमध्यें इष्ट आणि पूर्त्त हे दोन्ही शब्द एकत्र आढळतात. याचें कारण असे भासतें कीं, पदोपदी यज्ञसंबंधी कर्मात दानें येणारच, आणि आर्य- धर्मात यज्ञ मुख्य आहे, व अंतर्वेदी देश हा मुख्य यज्ञिय देश, जेथें कृष्णसार मृग स्वभावतः चरत असतो, त्या देशांतील दानास लक्षणेनें इष्ट ह्मणत असत. आतां अति प्राचीन ग्रंथ पाहातां ऋग्वेद संहितेत इष्टापूर्त्त ह्मणजे स्वर्गास जाण्याची साधनें असें लिहिलेले आहे. (१०२.) तैत्तिरीय आरण्यकांत इष्ट व पूर्त ह्या दोन्ही शब्दांचा प्रयोग सांप्रत काला- प्रमाणेच केलेला आढळतो. (१०३.) हेमाद्रिकृत दानखण्डांत इष्टांपूर्त याच्या अर्थाबद्दल खाली लिहिलेली प्रमाणें दिलेलीं आहेतः (पाहा कलकत्ता येथील आवृत्ति, पृ० १९, २० ) :- ६. याज्ञवल्क्य. अ० १, श्लोक० २०० - २०१ ( भा० २८० १८६ ) मनु अ० ४, श्लो० १९०-१९२-१९३. ७. मण्डल १०, सू० १४३ “सं ग॑च्छस्व पि॒तृभः संय॒मेनेष्टपूर्तेन पर॒मेव्यो॑मन् ॥ हि॒त्वा या॑ व॒द्यं पुनरस्त॒ मेहि॒ संगच्छस्वत॒न्वा॑ सुवर्चा:" ॥ यावर माधवकृत भाष्य येणेंप्रमाणें- हेमदीयपितः ततस्त्वं परम उत्कृष्टे व्योमन् व्योमनिस्वर्गाख्ये स्थाने स्वभूतैः पितृभिः सह संगच्छस्व इष्टापूर्तेन श्रौतस्मार्तदानफलेन संगच्छस्व । तष्टापूर्ते सहागम्या वद्यं पापं हित्वा परित्यज्यास्तं त्रियमाणाख्यं गृहमेहि आगच्छ । ततः सुवर्चाः । तृतीयार्थे प्रथमा । सुवर्चसा शोभनदीप्तियुक्तेन तन्वा स्वशरीरेण संगच्छस्व ।। ८. प्रपाठक १०, अनुवाक १, ६, “इष्टापूर्त बहुधाजातमित्यादि." याचा अर्थ सा- यण असा करतातः - 'इष्टं,' दर्शपूर्णमासादिश्रौतंकर्म । ‘पूर्त’ वापीकुपादिस्मार्तं कर्म । इ०. याशिवाय आणखी, अमरसिंह यांची अशी व्याख्या करतो:- कांड २ वर्ग ७ श्लो० २७: – || त्रिप्वथ ऋतुकर्मेष्टं पूर्त खातादिकर्मयत् ॥