पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० १०. सार्वजनिक धर्मकृत्यें. २६५ (४९८.) धर्माच्या संबंधानें हिंदुलोक देवालयें, पुष्करण्या, विहिरी, तलाव, प्रपा (पाणपोया), बागा, धर्मशाळा, घाट, अन्नसत्रें, सदावर्ते, वृक्षारोपण इत्यादि कृत्यें कर्शी करितात; व त्यां त्यांमध्यें प्रतिष्ठा व उत्सर्ग हे विधि कसे होतात; व त्यांवरून ते करणारांची त्यांवरील सत्ता किती जाते व किती राहते याचें विवेचन वरील ग्रंथांत नाहीं ह्मणून पुढे थोडेंसें करितों. (४९९.) पौरोहित्यकर्म निंद्य मानिलें आहे ही गोष्ट प्रसिद्ध आहे: ( अध्यात्मरामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १ श्लोक ९). परंतु दानाचा मूळ उद्देश पुरोहिताच्या कल्याणाक- रितां करण्याचा नाहीं. सर्व देशांत व सर्व कालीं प्रायः प्रतिग्रह करणारांचें तपःसामर्थ्य कमी असले तर त्या योगानें त्यांची बुद्धि भ्रष्ट होते व व्हावी हें साहजिक आहे. या न्यायानें या देशांतील ब्राह्मणांस दुष्प्रतिग्रहरूपी पाप भोगलेच पाहिजे; व प्रायः बरेंच त्यांच्या वांड्यास तें आलेंही आहे यांत कांहीं आश्चर्य नाहीं. परंतु धर्मकृत्यांसाठी व धर्मादायासाठी देणग्या घेणें हें प्राचीन कालीं ब्राह्मणांस स्वभावतः प्रिय होतें असें ह्म- णणें रास्त आहे असें दिसत नाहीं. अशा देणग्या देणें व घेणें हा सर्वत्र मानवस्वभा- · वच आहे. जितकें प्राचीन आर्यग्रंथकारांच्या हातांत होतें तितकें त्यांन घेण्याच्या संबंधानें निषेध करण्यांत केले आहे. ( २ ) शामचरण सरकारचें व्यवस्थादर्पण ( दुसरी आवृत्ति ) ८० ३२३–३३२. ( ३ ) एफ० ई० एल्वलिंगकृत दायविभाग, देणगी, मृत्युपत्र, विक्री, गहाण या विषयांवर ग्रंथ; मद्रास, १८५६, कलमें २०९, २०६, २७०, ३३० (४); ( ४ ) मि० जस्टिम् स्ट्रेंजकृत हिंदुधर्मशास्त्र, कलमें २८० (१) आणि २८२ ( ५ ) ( बंगालचा ) १८९० चा कायदा नंबर १९.. ( ३ ) (मद्रासचा) १८१७ चा कायदा नंबर ७. (७) स० १८६३ चा आक्ट २०, व स० १८६७ चा आक्ट २२. (८) मुंबईसंबंधीं, मि० ए० के० नेर्नकृतरेव्हेन्यु ह्यांडबुक, ट० ३७४, ३८६. ( आवृ० दुस० ). (९) मुंबई आक्ट १८६५ चा ७ वा. ४. मेनकृत हिं० घ० ग्रंथ० ० ४८०. ० ५. पाहा याज्ञवल्क्य अ० २ श्लोक २०२, २१३, (मा० २ ४० १८६-१८७); मनु, अ० ४ श्लो० १८६ शिवाय झटले आहे की:– “परान्नं सुकृतं हन्ति परस्त्री हन्ति जीवनम् । परसेवा सुखं हन्ति सर्व हन्ति प्रतिग्रहः" ।