पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६४ हिन्दुधर्मशास्त्र. • प्र० १० (४९७.) ह्याविषयीं खाली लिहिलेल्या इंग्रेजी ग्रंथांत थोडी माहिती मिळते. तीं स्थलें वाचकांच्या उपयोगाकरितां टिपून घेतली आहेत. ह्याशिवाय आलीकडे मि० मेन ह्मणून प्रख्यात इंग्लिश ग्रंथकाराने छापलेल्या इंग्लिश रिपोर्टोच्या व इतर इंग्लिश ग्रंथांच्या आधारानें हिंदुव्यवहारशास्त्राविषयों सुरस ग्रंथ रचिला आहे; त्यांत प्रकरण १२४० ४८०-४८७ ह्या विषयाचे उद्घाटन केलें आहे त्यांतील तात्पर्य भाषान्तरानें पुढें दिले आहे:- 66 एकाद्याच्या नांवानें धर्मादाय देणगी चालू असून तो मृत्यु पावल्यामुळे किंवा त्याच्या गैरवर्तनामुळे ती देणगी त्याच्या पश्चात् कोणाच्या नांवानें चालावी हे त्या देणगीच्या संबंधानें जें प्रथम करारपत्र झाले असेल त्यावर अवलंबून असतें, किंवा. तसे स्पष्ट करारपत्र नसेल तेव्हां प्रत्येक ठिकाणचा जो देशाचार असेल त्यावर अवलंबून असतें. जेथें धर्मसंबंधी देणगीस पुढे वारस कोण है दानपत्रांत सांगितलेलें नसतें, तेथें दान घेणाऱ्याच्या वारिसांकडे त्या देणगीच्या व्यवस्थेचा हक्क जातो; कारण, जेव्हां दानपत्र निर्बंधवाचक शब्दांनी युक्त नसतें तेव्हां ती देणगी वारिसांकडे जाते असा नियम आहे. ज्याकडे देणगीच्या कामाची व्यवस्था त्याजकडेसच देणगीची मालकी • जाते, ह्मणून अशी मालकी व व्यवस्था हीं एका कुटुंबांतील अनेक मनुष्यांत विभागलीं जात नाहीत. जेथें स्पष्ट उल्लेख किंवा देशाचार नसेल तेथें अनेक वारिसांनी पाळी- पाळीनें व्यवस्था करावी. कधीं कधीं धर्मसंबंधी देणगीची व्यवस्था अनेक व्यक्तींकडे असावी अशी व्यवस्था प्रथमपासूनच असते. त्या अनेक व्यक्ति निरनिराळ्या पक्षांचे प्रतिनिधि असतात; किंवा एकाकडून कांहीं गैर झाल्यास त्यावर दुसऱ्याची नजर असावी असा उद्देश असतो. अशा अधिकारी मंडळीच्या नियमास विरुद्ध जें कृत्य असेल ते कायदेशीर समजले जाणार नाही. जेथें धर्मसंबंधी संस्थानाच्या मुख्य अधिकाऱ्याने अविवाहित असावें असा नियम असेल तेथें बहुतकरून अशी चाल असते कीं, तो आपल्या वारि- साची नेमणूक आपल्या हयातीतच करतो किंवा मृत्युपत्रानें करतो. कधीं कधीं अशी नेमणूक धर्मसंबंधी मंडळीकडून कायम व्हावी लागते. कधीं कधीं नेमणूक करण्याचें काम त्या मंडळीकडेच असतें. परंतु देणगी घेणारास तिच्या व्यवस्थेच्या हक्काची - जरी देणगीच्या शर्ती पुऱ्या कराव्या अशा करारानें युक्त असली तरी विक्री करण्याचा अधिकार कधींही नाहीं" [ टिप्पणी गाळल्या आहेत ]. ३. ( १ ) कावेल कृत टागोर लॉ लेक्चर्स, सन १८७० सालचीं, ८० ६५–७१:-