पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० १०. सार्वजनिक धर्मकृयें. व्यवस्था योग्य रीतीनें चालावी ह्या हेतूनें, देशरिवाजास अनुसरून एका कुटुंबाकडे वं- शपरंपरेनें चालतात, तथापि इतर दायाप्रमाणें ही मिळकत वारशानें मिळत नाहीं असे साधारण रीत्या एथें लिहिले असता चालेल. बंगाल्यांत पुष्कळ धर्मसंबंधी संस्थानांच्या व्यवस्थापकांची नेमणूक देशाचारतः कांहीं इयत्तेनें निवडणूक करून करितात; आणि तो व्यवस्थापक मेल्यानंतर, तेथील चालीप्रमाणे शेजारचे महन्त (ह्मणजे अशा दुसऱ्या संस्थानांचे व्यवस्थापक ) आपल्या मतांनी निवड करून नवा महन्त नेमतात." - दुसरा एक प्रख्यात इंग्लिश ग्रंथकार बंगाल्यांत जज्ज होता, तो मिस्तर डब्ल्यू. एच्. भ्याक्नाटन. तो आपल्या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणांत जिंदगीचे चार विभाग ॰करतोः— ( १ ) स्थावर, ( २ ) जंगम, ( ३ ) वडिलार्जित, व ( ४ ) स्वसंपादित. परंतु ह्या विभागांत सार्वजनिक धर्मकृत्यें ह्या नांवाच्या मिळकतीचा निराळा वर्ग त्या ग्रंथीं नाहीं. शिवाय त्याच ग्रंथकारानें ( वालम २, पृष्ठ ३०५, ) यावर देवास दिलेल्या ज मिनींची विक्री भागवत पुराणाच्या आधारानें निषिद्ध केलेली आहे असे सांगितलें आहे; परंतु ह्यासंबंधानें ह्या ग्रंथांत आणखी कोर्टाचा ठराव दिलेला आढळत नाहीं. तिसरा इंग्लिश ग्रंथकार कोल्बूक यानें कोणत्या ब्राह्मणांचें स्वास्थ्य राजानें करून द्या, व त्या देणग्यांच्या संबंधानें त्या ब्राह्मणांनी कोणत्या रीतीनें चालावें ह्याविषयीं आपल्या " डायजेस्ट " मध्ये याज्ञवल्क्याच्या ह्यासंबंधी दोन श्लोकांचा उतारा घेऊन सांगितले आहे व नंतर बृहस्पतीच्याही एका श्लोकाचा ह्यासंबंधानें उतारा घेतलेला आहे: आवृत्ति ३ री, भा० १, ४० ५२, १३, व ८० २३०. याशिवाय, विवादचिंतामणीचें इंग्रेजी भाषांतर झालें आहे त्यांत (८० २२३) ज्यास देणगी दिलेली असेल तो त्या देणगीची नेमलेल्या कामासाठी योग्यपणें व्यवस्था करणार नाहीं तेव्हां ती देणगी परत घ्यावी अर्से लिहिले आहे; व त्याचप्रमाणे जे सार्वजनिक रस्ते दूषित करतात, अथवा बाग व पाण्याचे पाट यांच्या जवळ घाणेरडे पदार्थ टाक- तात, त्यांस शिक्षा देण्याविषयींही ह्या पुस्तकांत लिहिलेले आहे; परंतु सार्वजनिक उपयोगासाठीं हीं स्थळें उद्दिष्ट आहेत किंवा कसें हें समजत नाहीं. ह्रीं स्थळे खासगी असावी असे वाटतें. त्याच ग्रंथीं (८० १०८) कराराप्रमाणें न चालणाऱ्याविषयीं बृहस्पतिवचनाच्या आधारानें पुढील लेख आढळतोः “ गांवकरी, कामकरी ब्राह्मण, इत्यादि लोकांनी सार्वजनिक उपद्रवांसंबंधी व्यवस्था करण्यासाठी व चांगली कामें कर- ण्यासाठीं कांहीं नियम ठरविले पाहिजेत असें बृहस्पति ह्मणतो.” परंतु यांतही विशेष गोष्टीस उद्देशून कांहीं सांगितलेलें नाहीं.