पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६२ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० १० किंवा जिल्हा कोडतांत दावा करावा. तीचा हुकुमनामा मिळेल:- त्यांत खालीं लिहिलेल्या पांच प्रकारांपैकीं मद- (अ) त्या देणगीचे नवे व्यवस्थापक नेमणें. (ब) त्या देणगीच्या व्यवस्थापकांकडे तत्संबंधी कांहीं मालकी देणें. (क) देणगी ज्यांच्या नांवें करून दिली असेल त्यांच्या हिशाचे विभाग ठरविणें. (ड) सर्व देणगी किंवा त्यापैकीं कांहीं विषय किंवा मालकी भाड्याने देण्याचा किंवा विकण्याचा किंवा गहाण ठेवण्याचा किंवा बदली देण्याचा अधिकार देणें. (इ) देणगीच्या व्यवस्थेबद्दल कांहीं नियम ठरविणें; किंवा त्या देणगीसंबंधी अ.. शाच किंवा दुसऱ्या ज्या कांहीं हरकती असतील त्या दूर करणें. या कलमानें आड्व्होकेट जनरल यांस जे अधिकार दिले आहेत, तेच अधिकार (जेथें आङ्होकेट जनरल नसेल तेथें ) सरकारी वकिलास आहेत, व ( जेथे सर- कारी वकील नसेल तेथें ) सरकारी वकिलाच्या ऐवजी स्थानिक सरकार ज्या कोणास नेमील त्यासही तेच अधिकार आहेत. " (४९६.) यावरून सार्वजनिक धर्मकृत्याशी कोणाचा संबंध किती असतो याचा विचार करणें आवश्यक आहे. ह्याविषयींची माहिती मुख्यत्वेकरून पुराणें आणि आचा- रप्रायश्चित्तप्रकरणीं संस्कृत ग्रंथांत असल्यामुळे इंग्रेजी ग्रंथकारांस ती उपलब्ध झालेली दिसत नाहीं. २. इंग्रज ग्रंथकारांमध्यें प्रायः सर टामस स्ट्रेंज ह्मणून मद्रासेस उत्तम न्यायाधीश होता त्याच्या ग्रंथांस प्रथम मान देतात. त्यांत कांहीं उल्लेख या विषयासंबंधीं आहेत त्यांचें तात्पर्य पुढील भाषान्तरांत आहे :- आपल्या पुस्तकाच्या " जिंदगी " ह्या प्रकरणांत सर टामस स्ट्रेंज, धर्मसंबंधी देण- ग्यांविषयीं असें लिहितो:- 66 'दुसऱ्या विषयांशी यांचा थोडाबहुत तरी संबंध आहे ह्मणून, ह्या पुस्तकाच्या कांहीं भागांत, धर्मसंबंधी प्रतिष्ठा, देवस्थानें वगैरे, अग्रहार, व राजाचें जवाहीर ह्यां- विषयीं संक्षेपानें उल्लेख केला जाईल; ह्यांसंबंधी मिळण्याजोगी माहिती फार थोडी उप- गत असल्यामुळे विस्तारानें विवेचन करतां येत नाहीं. " तोच ग्रंथकार आपल्या पुस्तकाच्या त्याच प्रकरणांत (ट० १११) आणखी असें लिहितो कींः—“धर्मकृत्यासाठी दिलेल्या जमिनी, इतर खासगी जिंदगीप्रमाणें जरी त्यांची