पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ९ २५६ जी अज्ञानाची मुदत मोजण्याची यत्ता आहे, ती हिंदु शास्त्राप्रमाणे १६ वर्षांचीच आहे" सांप्रत स. १८७५ चा आक्ट ९ क. २, व स. १८७७ चा आक्ट १९, क. ७ प्रमाणे पूर्वी लिहिलेल्या लग्न इत्यादि बाबती वर्ज्य करून बाकी ठिकाणी अज्ञानपणाची इयत्ता १८ व २१ वर्षे मोजली जाईल असे दिसतें. १२ ( ४८२. ) अनौरस मुलीची आई ही तिची स्वाभाविक पालन करणारी होय.' ( ४८३. ) अज्ञानाची आई व भाऊ असतील तर त्या दोघांतून आईचा पालन करण्याचा अधिकार जास्त आहे.' १३ (४८४.) एक भाऊ अज्ञान असतां तो व त्यांचे दुसरे अज्ञान भाऊ हे आपल्या सावत्र भावांच्या ताब्यांत होते. पुढे तो सज्ञान झाला तेव्हां त्याचा आपल्या सोदर अ- ज्ञान भावांचें पालन करण्याचा हक्क सावत्र भावांहून अधिक आहे असे ठरले.' १४ १५ ( ४८५.) अज्ञानासाठी जें योग्य कर्ज त्याच्या पालन करणारानें केलें असेल त्याचा बोजा अज्ञानाच्या इस्टेटीवर पडेल; " एरव्हीं पडणार नाहीं. त्याची आई व विधवा ह्या दोघींनी जर कोणते कृत्य स्वतःच्या नांवांनी केले व त्यानें तें वयांत आ- ल्यावर मंजूर केलें नसेल तर त्यानें तो बांधला जात नाही. १६ ( ४८६.) अज्ञानाच्या खरोखर हिताकरितां जे काम पालन करणारार्ने निष्कपट बुद्धीनें केले असेल, त्यांत मजबूद कारणांशिवाय कोर्टानीं हात घालू नये. १७ परंतु अज्ञा- नाच्या जमिनीचे निरंतर चालणारे पट्टे जर पालन करणारानें दिले असतील तर तें करणें स्पष्ट रीतीनें अज्ञानाच्या हिताकरितां आहे असा स्पष्ट पुरावा असल्याशिवाय ते पट्टे रद्द होतील. १८ ११. मुं हा. रि. वा. २ पृ. ३४४, स्पे. अनं. १७४ सन १८६५. १२. म. स. अ. चे रि. सन १८६० पृ. १२४ ता. ५ सप्टेंबर सन १८६०. १३. कलकत्ता स. दि. अ. चे रि. वा. ७ पृ. ३९५ ता. २० सप्टेंबर सन १८४७. १४. आग्रा स. अ. चे रि. वा. ५ पृ. ता. १९ सप्टेंबर सन १८५०, देवीसिंग व दुसरे वि. यजितसिंग व दुसरे. १५. म. स, अ. चे. रि. वा. १ पृ. ५१ नं. १ सन १८१२; सदर्लंड्स् वी. रि. वा. ५ पृ. २ तागाईत ४ रे. अ. नं. ३०४. सन १८६५; स. वी. रि. वा. ११, पृ. १३४; मू. इं. अ. वा. पृ. ४५४; मू. इं. अ. वा. ६ प ३९३; इं. का. रि. क. २ वा. पृ. २८३, आणि वा. ४ १०, पृ. ३३. १६. मणीशंकर वि. बाईमुळी इं. ला. रि. १२ मुं. ६८६. १७. सदर्लंड्स वी. रि. वा. २ पृ. २७० स्पे. अ. न. ३१६६ सन १८६४. १८. सदलेड्स वी. रि. बा. २ पृ. ३२५ स्पे. अ. नं. ३६१० सन १८६४.