पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. परंतु सांप्रत पाहूं गेलें असतां त्यांस स्वातंत्र्य पुष्कळ आहे. त्या आपल्या इस्टेटाचीं वहिवाट मुखत्यारीनें करितात व आपल्या अज्ञान मुलांचें पालन करून ती सज्ञान होईपर्यंत त्यांच्या कारभार पाहतात. तेव्हां त्यांचें पारतंत्र्य आतां दाय घेण्यापुरतें शास्त्रतः मात्र. राहिले आहे, व्यवहारांत विशेष राहिले आहे असे दिसत नाहीं. २५४ प्र० ४ ( ४७५. ) अज्ञानाच्या धनाचे रक्षण राजानें करावें असे मनूचें वचन आहे; आणि सांप्रत सन १८६४ चा का० २० कलम १ यांत याविषयीं सांगितलेले आहे कीं, 'यूरोप खंडात जन्मलेली ब्रिटिश रैयत नाहींत अशा सर्व अल्पवयी मुलांचा संभाळ करण्याचा. व त्यांची मालमिळकत स्वाधीन घेण्याचा अधिकार दिवाणी कोर्टास आहे." ( ४७६.) सदरह आक्टाचें. कलम ६ यांत सांगितलेले आहे. की,-" अल्पवयी मुलाची मालमिळकत स्वाधीन घेण्याचे हक्काविषयीं कोणी मनुष्य दावा करीत असेल त्यास तो हक्क मृत्युपत्रावरून किंवा लेखावरून किंवा इतर दस्तऐवजावरून आहे. आणि ती मालमिळकत आपले जिम्यास घेण्यास तो राजी आहे असें नजरेस येईल तरत्या मनुष्यास मालमिळकतीची वहिवाट करण्याचे अधिकारांचा दाखला कोर्टानें द्यावा. सदरहू प्रकारचा हक्क असणारा कोणी मनुष्य नसेल किंवा मालमिळकत आपले जिम्यास घेण्यास सदरहू प्रकारचा मनुष्य नाराजी असेल आणि अल्पवयी मुलाचा कोणी जवळचा नातलग मुलाची मालमिळकत आपले जिम्यास घेण्यास राजी असेल तर त्या नातलगास दाखला देण्यास कोर्ट मुखत्यार आहे. बापानें कोणी पालन करणारा नेमला नसेल तेव्हां सदरहू प्रकारचे मनुष्यास किंवा सदरहू प्रकारचे नातलगास किंवा त्या अल्पवयी मुलाचे इतर कोणतेही नातलगास किंवा सोहियास त्याचा पालन करणारा नेमणें आपणास योग्य वाटेल तर त्याप्रमाणें नेमण्यासही कोर्ट मुखत्यार आहे. " ( ४७७.) परंतु एकत्र कुटुंबास हा आक्ट लागू होत नाहीं असे ठरले आहे; प 66 ४. मनुस्मति अ० ८ को० २७ व २८ बालदायादिकंरिक्धंतावद्राजानुपालयेत् । यावत्सस्यात्स मावृत्तोयावच्चातीतशैशवः ।। वंभ्याऽपुत्रासुचैवस्याद्रक्षणनिष्कुलासुच || पतिव्रतासुचस्त्रीषुविधवास्वातुरासु- च ।। " अर्थः – अनाथ अशा बालकाचे द्रव्य जर त्याचा चुलता वगैरे सबंधी अन्यायाने घेऊ पहातात तर त्या द्रव्याचे रक्षण राजानें करावें. त्या बालकाची सोडमुंज होईतोपर्यंत करावे. जर बालपणींच सोडमुंज झाली असेल तर त्याचें सोळा वर्षांचें वय होई तावत्कालपर्यंत राजाने त्याच्या द्रव्याचे संरक्षण करावें, वंध्या, अपुत्र, व ज्यांच्या द्रव्याचे रक्षण करणारा कोणी सपिंड नाहीं व साध्वी, विधवा, आणि रोगिणी यांचे द्रव्य राजानें रक्षण करावें. वरील शास्त्रार्थ, कोणी अन्यायानें त्यांचे द्रव्य हरण करील तर त्याविषयींचा जागावा. तसे. नसेल तर राजाच्या रक्षणाचे कारण नाहीं हे उघडच आहे.