पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण नववें. अज्ञान व त्यांचें पालन करणार. ( ४७१. ) सोळा वर्षे पुरी होईपर्यंत मनुष्य अज्ञान आहे अमें ठरविले आहे.' बंगाल्यांत १५ वर्षे पूर्ण झार्ली ह्मणजे बस आहे ( पहा. बं. ला. रि. वा १० पृ. २३१ ) ( ४७२ ) स्त्रियांच्या अज्ञानपणाची मुदत निराळी कोठें दर्शावलेली नाहीं यास्तव तीही वर्षेपर्यंत समजली पाहिजे. ( ४७३. ) सन १८७५ चा आक्ट ९ कलम २ वरून लग्न करणे व तोडणें, द- त्तविधान, व पल्ला इं., यांविषयीं पुरते धर्मशास्त्राचे वयाविषयीं नियम चालू आहेत. अन्य व्यवहारास १८ वर्षे पूर्ण झाली पाहिजेत; आणि ज्याच्याकरितां कोर्टाचें सर्टिफिकिट मि ळालें असेल, तो २१ वर्षांनी सज्ञान होतो. कोर्टानें पालक नेमला ह्मणजे मग सर्टिफिकिट मिळाले असो वा नसो, वयांत २१ वर्षे झाल्यावर येतो. बंगाल्यांत ( स० १८१८ चा आक्ट ४० यावरून ) अज्ञानांच्या (इस्टेटाची व्यवस्था ) कोर्ट आफ् वार्डस् करितें. ( ४७४. ) स्त्रीयांस स्वातंत्र्य नाहीं याविषयी प्राचीन शास्त्राकारांची वचनें पुष्कळ आहेत. १. बा. रि. वा. १ पृ. ४१७. नं. ३४ ता. २५ जुलई सन १८१६; मुं. हायकोर्ट रि. वा. २ पृ. ३४४ स्पे. अ. नं. १७४ स. १८६५. २. रुद्रप्रसाद वि. भोलानाथ ई ला, रि. १२. क. ६१२; गिरिसचंद्र वि. अग्रदूल ई. ला. रि. १४ क. ५५. ३. त्यांतून कांहीं थोडर्डी सांगतों- कृष्णपण्डितकृत दायक्रमसङ्ग्रह पृष्ट ३ नारद: – “ मृतेभर्तर्यपुत्रायाः पतिपक्षः प्रभुःस्त्रियाः । वि- नियोगार्थरक्षासुभरणेच .स ईश्वरः || परिक्षीणेपतिकुळेनिर्मनुष्यनिराश्रये । तत्सपिण्डेषुचासत्सुपितृपक्षः प्रभुःस्त्रियाः ।। विनियोगेदानादौपतिपुत्रावे भर्तृकुलपारतंत्र्यंतस्याइति. अर्थः - अपुत्र स्त्रीचा नवरा मरण पावल्यानंतर नवऱ्याचे संबंधी तिचे मालक होत, दानादिक करणे, रक्षण, व पोषण, यांविषय नवऱ्याचे संबंध मालक आहेत, नवऱ्याचें कुल क्षीण झाले व त्याचे सपिंड नाहींसे झाले. असतां अपुत्रविधवेचें संरक्षण करणारे तिच्या बापाच्या वंशांतील पुरुष होत. पति आणि पुत्र यांच्या- अभावीं विधवेनें नवयाच्या दायादांच्या पारतंत्र्याने वागावें. " मनु अ० ९ श्लो० ३ " पितारक्षतिकौमारेभर्तारक्षतियौवने । रक्षंतिस्थाविरेषुत्रानस्त्रीस्वातंत्र्यमई- ति ।। ” अर्थः—कौमारवयाच्या ठाय पिता रक्षण करितो; तारुण्याच्या ठार्थी भर्ती; वृद्धपणीं पुल; मिळून स्त्री स्वतंत्रपणानें वागण्यास योग्य नाही. " - मिताक्षरा प० १२. याज्ञवल्क्य लो० ३५; पृ० १" रक्षेत्कन्यांपिताविन्नांपतिः पुत्रास्तुवार्धके । अभावेज्ञातयस्तेषां नस्वातंत्र्यंकचिस्त्रियाः ।। " अर्थ:-कन्येचें संरक्षण पित्यानें करावें; विवाहानतर स्त्रीचें संरक्षण पतीनें करावें; वृद्धपणीं पुत्नांनी करावें; त्यांच्या अभावीं ज्ञातीनें करावें; परंतु कोणत्याही वेळीं • स्त्रीस स्वतंत्रपणा नाहीं.