पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५२ हिंदुधर्मशास्त्र. प्र० ८ इं. ला० रि० मुं० वा० १ पृ० ७३. हा नियम गहाणास लागत नाही. मुं० हारि० वा० १ पृ० १५७. परंतु ही गोष्ट ज्या ठिकाणी गहाणदार ह्याच्या हातांत गाहण ठेव- लेली जमीन असते आणि शेवटच्या हिशोबांत गाहाणदार आणि गाहाण ठेवणारा यांचे- मध्यें परस्पर मुद्दल व व्याज आणि भाडें व उत्पन्न यांचा हिशोब होतो तेथें मात्र लागते. जेथें ही स्थिति नाहीं तेथें हा दामदुप्पटीचा नियम लागतो: मुं० हा० रि० वा० ५ अपी० शा० पृ० १९६; मुं० हा० रि० वा० ९ १० ८३: बाळकृष्ण बाबाजी वि० गोविंद ( इं० ला० रि० १५ मुं० ८४ ) दामदुप्पटीचा नियम ऋणको हिंदु असेल तेव्हांच लागतो. इतर जात उ० मुसलमान असेल तेव्हां लागत नाही: ( दाउद वि० वल्लभदास इं० ला० रि० १८ मु० २२७ ). (४६९.) वस्त्र चौपट, धान्य तिप्पट, आणि नाणे दुप्पट, आणि रस आठपट या- प्रमाणें व्याजाविषयीं शास्त्रार्थ सांगितलेला आहे.' ९२ ( ४७०.) पशु गहाण ठेविले असतील तर त्यांचें व्याज त्यांची संतति हेच स- मजावें ( ४७०अ. ) कोणाकडेस ठेव ठेविलेली असेल तो ज्यापाशी ठेविली त्याच्या लवा- डीशिवाय जर अस्मानी किंवा सुललतानी कारणांवरून नाश पावली असेल तर मालकास कांही मिळणार नाहीं. ठेवणाराच्या हयगयीमुळे नाश झाला असेल तर सर्व भरून द्यावी लागेल, आणि अज्ञानामुळे झाली असेल तर तीन चतुर्थांश द्यावी लागेल." ९२. मि. भा. पृ. १११ व ११२. ९३. म. भा. पू. ११२. ९४. भि. भा. पृ. १२३ व १२५.