पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. (४५९.) बाकी राहिलेला प्रकार गहाण देणे हा होय. ह्यामध्ये देखील सांप्रत कवजा देण्याची जरूर राहिली नाहीं. त्याऐवजी गहाणरोखा रजिस्टर केलेला असला ह्मणजे झाले. विक्रोप्रमाणेच ह्या व्यवहारांतही कवजा देणें अगर खत रजिस्टर करणे ह्या गोष्टो, दोन अगर अधिक गहाणदारांमध्ये वाद उत्पन्न झाल्यास महत्वाच्या आहेत. ह्या गोष्टी एकाच जामेनोवरचे अनेक गहाणदारांच्या हक्काचा क्रम दाखविण्याकरितां उपयोगी पडतात. ह्मणजे जर पहिल्या गहाणदाराजवळ कचना नसून त्याचा गहाणरोखा , रजिष्टरही झाला नसेल, आणि दुसरे गहाणदाराकडे कवजा अगर रजिस्टर खत ह्या गोष्टी असतील, तर दुसऱ्या गहाणदाराचा हक्क पहिल्याच्या हक्कास मार्गे सारितोः ( इं० ला० रि० मुं० २ पृ० ६६२.) वस्तुतः गहाण ठेवणारा व गहाण घेणारा ह्यांच्यामध्ये आपसांत ह्या गोष्टीचें मुळींच महत्व राहिले नाहीं. ( मुं० हा० रि० वा० ९ पृ० ३०४. ) तसेच पहिल्या गहाणाचा कचजाही नसून रजिस्टरही नसेल, व म्यानंतर तीच जमीन दुसऱ्याने विकत घेऊन तिचा कबजाही घेतला असेल तर दुसऱ्या खरेदीदारास तो जमीन संपूर्ण मिळून तिजवर त्या गहाणदाराचा कांहीं हक्क राहात नाहीं. अशा वेळेस कबजाचें आणि रजिस्टराचें वर सांगितल्याप्रमाणेच महत्व आहे. ६८ २४८ ( ४६०. ) गुजराथेत सानगिने ह्मणून एक गहाणाचा प्रकार आहे. त्यामध्यें कचजाची बिलकूल जरूर नाहीं. ह्या गहाणामध्ये मात्र जरी गहाणदारास कबजा नसून त्याचे मागून येणाऱ्या गहाणदारास अगर खरेदीदारास कबजा मिळाला तरी पहिल्या गहाणदाराचा हक्क मार्गे हटत नाहीं." ( ४६१. ) वरील सांगितलेला कबजा अगर रजिस्टर ह्या दोहींचा अभाव अस ला तरी केव्हां केव्हां पहिल्या गहाणदाराचा हक्क मागें हटत नाहीं. जसें मागून येणारे गहाणदार अगर खरेदीदारास त्याचें गहाण अगर खरेदी होण्याचे वेळेत पहिल्या ग हाणदाराचें प्रत्यक्ष ज्ञान असेल, अगर असें ज्ञान होण्याजोगी तेव्हां त्याची स्थिति अ- सेल, तर पहिल्या गहाणदारास कबजा किंवा रजिस्टर हीं अनुकूल नसली तरी त्याचा हक्क जशाचा तसाच राहतो. ७० ( ४६२. ) वरील दर्शविलेल्या प्रकारांखेरीज गहाणाचा आणखी एक प्रकार ६८. हरी रामचंद्र वि. महादाजी ८ मुं. हा. को. रि, अपी. शा. ५०; बाळाजी वि. रामचंद्र ११ मुं. हा. को. रि. ३७; खेमराज वि. लिंगाप्पा, व शेषगिरी वि. सालवादोर इं. ला. रि. मुं. वा. ५, पृ. २ व ५० ६९. परमय्या वि. सोंडेश्रीनिवासप्पा इं. ला. रि. मुं. व्हा. ४ पृ. ४५९. ७०. मुं. हा. रि. व्हा. ७ पृ. ६०; इं. ला. रि. मुं. व्हा. ४ पृ. ८३, १२६.]