पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ८ स्वत्वनिवृत्ति. २४७ ६२ एका कज्यांत बापाने मरतेसमयों आपली स्वकष्टार्जित जमीन माझ्या मुलीला बक्षीस दे अर्ने मुलास सांगितले. तो मेल्यावर त्याप्रमाणे आपल्या बहिणीस त्याने जमिनीचा ताबा रेजि- स्टर्ड बक्षिसपत्र करून दिला. नंतर तो मेल्यावर त्याच्या मुलांनी बक्षिसाच्या वेळेस ताबा नव्हता सचच ते रद्द व्हावे असा दावा आणला. दावा रद्द झाला. अला- हावादेसही ताबा दिला नसला तरी बक्षीसपत्र दिले असले तरी चालेल असें ठरलें आहे. तसेंच दान सशास्त्र होण्यास ग्राहक जिवंत पाहिजे किंवा उदरांत तरी असला पाहिजे: आहे (पहा बं. ला. रि. वा. ९ पृ. ३७७.) ट्रान्स्फर आफ प्रापर्टी आक्ट कलम १२३ अवश्य पहावें. (४९८.) मूल्यवान मोबदल्याने होणाऱ्या स्वत्वनिवृत्तीचे मुख्य दोन प्रकार आहेत:- ( १ ) विक्रो आणि (२) गहाण. विक्रीमध्ये विकलेल्या वस्तूचा कबजा ग्राहकास पूर्वी दिला पाहिजे होता. परंतु आतां विक्रीपत्र रजिष्टर केलें तर कबजा न दिला तरी चालतें. क- बजा देणे अगर रजिष्टर करणें ही वस्तुतः विक्रीची क्रिया पुरी होण्यास आवश्यक नाहीत; परंतु जथं एक मनुष्य तीच वस्तु दोन अगर अधिक मनुष्यांस विकतो, तेथे ह्या गोष्टींचं महत्व आहे. ४ परंतु आतां देणाऱ्याचा कबजा असण्याची जरूरी नाहीं, असें प्रिव्ही कौन्सिलने ठरविलें आहे. ६५ ६६ विकत देणारा जी वस्तु विकतो ती जर त्याच्या हातांत नसेल तर त्याला ती प्र त्यक्ष विकतां येत नाहीं; परंतु त्या वस्तूवरील त्याचा जो हक्क असेल तो विकला जातो. मात्र त्या विक्रीच्या शब्दांवरून असे दिसून आले पाहिजे की, ती हातांत नसलेली वस्तु हातांत आहे असे समजून विकली न जातां विकणाराचा तिजवरील आपला हक्क मात्र विकण्याचा उद्देश आहे; ह्मणजे लेखांत यथार्थ व्यवहार नमूद केला पाहिजे. ज्या हिं- दूची इस्टेट दुसऱ्याच्या हातांत असेल, त्यास त्या इस्टेटीवरचा आपला जो कांही हक्क असेल तो विकतां येतो. परंतु जर तो हिंदु ती इस्टेट हातांत नसून जशी काय आ- पल्या हातांत आहे या रीतीनें ती इस्टेटच विकील तर ती विक्री ज्याचे हातांत ती इस्टेट आहे त्याचे विरुद्ध चालणार नाही. ६७ ६२. भास्कर पुरुषोत्तम वि. सरस्वतीबाई इं० ला० रि १७ मुं. ४८६. ६३ मानभावी वि. नवनिध इं० ला रि० ४ अ० ४०. इं. ला. रि. ५म. २६७. बालमुकुंद वि. भगवानदास इं. ला. रि. १६ अ. १८५. धरमदास वि. निस्तारिणी इं. ला. रि. १४ क. ४४६. ६४. ललूभाई सूरचंद वि. बाई अमृत इं. ला. रि. मुं. वा. २ पृ. २९९. ६५. कालिदास वि. कनय्यालाल ला. रि. ११ इं. अ, २१८. उगरचंद वि, मुदप्पा इं. ला. रि. ९ मुं. ३२४. ६६. कचू बयाजी वि कचोबा विठोबा मुं. हा. रि. व्हा. १० पृ. ४९१. ६७. बाई सुरज वि. दलपतराम इं. ला. रि. ६. मुं, पृ. ३००; वासुदेव हरी वि. तात्या नारायण. ई. ला. रि. ६ मुं. पृ. ३८७.