पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४६ हिन्दु धर्मशास्त्र. प्र० ८ धर्मशास्त्राप्रमाणे ती घेणारा असेल, त्याणें त्या वस्तूवरच्या स्वत्वाचा कोणत्या तरी प्रकारें प्रतिग्रह केला पाहिजे. ह्या गोष्टी घडून आल्याखेरीज स्वत्वनिवृत्ति होत नाहीं असें मानितात. ह्या तिन्ही गोष्टी करणें झाल्यास देणारानें देय वस्तु घेणाराचे कबजांत दिली पाहिजे. कबजांत न दिल्यास अगर घेणारानें कबजांत न घेतल्यास स्वत्वनिवृत्तीची क्रिया बरोबर संपूर्ण होत नाहीं. पूर्वी हे तीनही प्रकार सारखेच मानीत असत. परंतु त्या वेळेस मूल्यवान् मोब- दला मिळून होणारी स्वत्वनिवृत्ति आणि फुकट होणारी स्वत्वनिवृत्ति ह्यांमध्ये फरक करीत नसत. अलीकडे असा फरक झाला आहे व त्यामुळे निरनिराळ्या प्रकारच्या स्वत्वनिवृत्तीला आवश्यक ज्या गोष्टी त्यांमध्येही तदनुसार तफावत झाली आहे. विक्री पुरी करण्यासंबंधानें ट्रान्सफर आफ प्रापर्टी आक्टाचे कलम १४ व गहाणासंबंधानें कलम ५९ पहावें. ( ४५७.) फुकट स्वत्वनिवृत्तीचा प्रकार दान अगर बक्षीस होय. जें देणा- राचे मालकीचें असेल त्याचे दान करितां येतें. हें दान कांहीं शर्ती जोड़न केले तरी केव्हां केव्हां चालतें; ह्मणजे दान करणारास घेणारानें पोसावें इत्यादि. तसेंच दाता जर दुखण्यांतून उठला तर दिलेली वस्तु प्रतिग्राहकानें परत द्यावी अशा प्रकारचेंही दान कायदेशीर आहे. मुंबई इलाख्यांत अविभक्त हिंदु कुटुंबांतील हिसेदारास दुसऱ्या हिसेदा- रांच्या अनुमोदनावांचून समायिक जिंदगीतील आपले हिशाचें दान करितां येत नाहीं व तो हिसा मृत्युपत्रानेंही देऊन टाकितां येत नाही असे ठरले आहे. " अविभक्त जिंदगी - मधील हिसा जोपर्यंत तो वेगळा केला नाही तोपर्यंत मृत्युपत्रानें देतां येत नाहीं. द्रास येथे अविभक्त कुटुंबांतील हिस्सेदारास त्या कुटुंबाचे समायिक जिंदगीमधील आपला हिसा दुसऱ्या हिस्सेदारांच्या संमतीखेरीज दान करितां येतो. मात्र तें दान कबजा देऊन पूर्ण झाले पाहिजे;" ह्या प्रकारच्या स्वत्वनिवृत्तीला ग्राहकांस कबजा देणें जरूर आहे. नाहीं तर दान पूर्ण होत नाहीं; रेजीस्टर करणे पुरे होत नाही, कारण तें ताबा देणें व घेणे यासमान नाहीं. कोणते तरी प्रकारचा ताबा पाहिजे; अनेक इसमांस समाईक बक्षीस दिलेलें असेल व त्यांपैकी एकाचा ताबा असेल तर बक्षीस दिलें असे जाहीर केले ह्मणजे तो सगळ्यांना उपयोगी होतो;" परंतु अलीकडे ठरावांचा ओघ फिरत आहे. ५८ म. ५७. गंगाबाई वि. रामण्णा ३ मुं. हा. रि. अपी० शा. पृ० ६६. वृंदावनदास वि. यमुनाबाई मुं. हा० रि० वा० १२ पृ० २२९. ५८. नरोत्तम जगजीवन बि. नरसनदास, मुं. हा० रि० अपी. शा. पृ. ६. बरील मतलयाचें वाक्य. सदर पुस्तकाच्या नवव्या पृष्ठावर आहे. निवाड्याशी याचा संबंध नाहीं. ५९. वेंकटपथी वि. लचमो. ६ म. जू. २१५. ६० इं. ला. रि. ७ मुं. १३१. लखमणी वि. नित्यानंद इं. ला रि. ७ क.४६४. ६१ बाईकुशल वि० लक्ष्मण इं० ला० रि० ७ मुं ४५२.