पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वत्वनिवृत्ति. २४५ सांच्या संमतीवांचून केली तर ती व्यवस्था योग्य कारणाकरितां केली हे दाखविण्याचा बोजा ज्यानें तं रिक्थ तिच्यापासून विकत अगर दुसरे प्रकाराने घेतले असेल त्यावर आहे." तिजपासून विकत घेणाऱ्याने ती आपल्या अधिकाराप्रमाणे चालली आहे अथवा विक्रीस योग्य कारण आहे एवढ्याबद्दल तरी आपली खात्री करून घेतली पाहिजे. " कसा खर्च केला हे पाहण्याची त्यास जरूरी नाही. दोन विधवा इस्टेटीच्या वारस होतील तर एकीला दुसरीच्या संमतीशिवाय त्यापैकीं इस्टेट गहाण टाकतां येत नाहीं. ५२ ५३ प्र० ८ ५४ ( ४५४.) ज्या मनुष्याचें चित्त अस्वस्थ * असतें, अथवा जो अज्ञान असतो त्यानें दिलेलें, अथवा ज्या व्यवहार. मध्ये कपट झालेले असतें तो व्यवहार, हीं कायदे- शीर नाहींत सबब कोर्टानीं रद्द करावीं, आणि अशा रीतीने झालेले विक्रय, दान इ- त्यादि व्यवहार न्यायाच्या कोर्टानी उलटावे. " ( ४५५. ) मौजे टोंकें, तालुके नेवासे, जिल्हा नगर या गांवांत रामाचें मंदिर आहे त्याची पूजा करण्यास हरिदास या नांवाच्या बैराग्यास ग्रामस्थ लोकांनी ठेविले. पुढे तो मेल्यानंतर त्याचा शिष्य गोदावरीदास याणें पूजा करण्याचे काम करीत असतां तें मंदिर विकलें. त्यावरून गांवकरी लोकांनी रद्द करून वहिवाट घेण्याविषयी फिर्याद केली. त्यावरून असा ठराव झाला कीं, गोदावरीदास यास अशा सार्वजनिक उपयोगाच्या देवळाची विक्री करण्यास अधिकार नाही. फक्त त्यास पूजा करण्याचा मात्र अधिकार होता. सचच झालेली विक्री रद्द करून देवळाची वहिवाट गांवकरी यांचे ताब्यात घेण्यावि- षयीं फिर्यादीप्रमाणे ठरात्र झाला. ५६ ( ४५६. ) स्वत्वनिवृत्तीचे तीन प्रकार व्यवहारांत चालत आहेत ते: ( १ ) दान ( बक्षीस ), ( २ ) आधमन ( गाहाण ), आणि ( ३ ) विक्रय (विक्री ) हे होत. ह्या तिन्हींमध्ये पहिल्याने दोन गोष्टी करणें हें फार जरूर आहे. त्या ह्या की, एक जो देणारा आहे त्याणें जी वस्तु द्यावयाची तिजवरचा हक्क अगदी सोडला पाहिजे, व तसाच जो ५०. पहा बाबू कामेश्वर प्रसाद वि. रण बहादुरसिंग ला रि. इं. अ. वा. ८ पृ. ८. ५१. रंगीळ बाई वि. विनायक इं. ला. रि. ११ मुं. ६६६. अमरनाथशहा वि. श्यामचरण कुवर इं. ला. रि. १४ अ. ४२०. ५२. उदयचंद वि. आशुतोष इं. ला० रि. २१ क. १९० ५३. श्रीगजपति राधामणी वि. महाराणी श्रीपशुपति अलकजेश्वरी इं. ला० रि० १६म. १. ५४. अस्वस्थ ह्मणजे भय, क्रोध, शोक, पराधीनता, लोभ, रोग इत्यादि कारणांनी योग्य अयोग्य विचार करण्याविषयीं जो असमर्थ आहे तो. ५५. मि. भा. पू. १८० तागाइत १८२. ५६. मुंबईच्या हायकोर्टाचा स्पे. अ. नं. ४९० सन १८६५, फडशा ता. ४ डिसेंबर १८६६.