पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४४ हिन्दुधर्मशास्त्र, ४५ केली असतां असे कृत्य करण्याची जरूरी होती असे आपणास योग्य चौकशीवरून क ळलें असे दाखविण्याचा बोजा गहाणदारावर अगर खरेदीदारावर आहे. विधवेपासून तिच्याकडे रिक्थरूपाने आलेल्या तिच्या नवऱ्याची स्थावर मिळकत विकत घेणारानें ती विक्री कायम राहण्यासाठी असे दाखविले पाहिजे की, ती विक्री ज्या कारणासाठी विधवेस स्थावर विकण्याचा अधिकार आहे त्या कारणासाठींच झाली होती. जरी त्या विधवेचा न- वरा विभक्त असून मयत जाहला असेल व त्याला मुलगा अगर नातू अगर पणतू हे नसतील, तरी अशा जरूरीच्या कारणांचा अभाव असेल तर विक्री कायम राहणार नाही. -. अशा स्थितींत तिला तिचा त्या जिंदगींत जो हक्क आहे तो मात्र विकतां येईल व तो हक्क ति मरणकालीं अगर पुनर्विवाहकाली संपतो. मुदतीच्या बाहेर नवऱ्याचें कर्ज गेलेलें असलें तरी तें देणें नैतिक दृष्ट्या रास्त आहे ह्मणून विधवेला त्यासाठी इस्टेटीची विल्हेवाट करतां येते.' ४६ ४७ . अशा प्रकारच्या योग्य कारणांखरीज जर कोणी विधवा स्थावर रिक्थाची कांहीं व्यवस्था करील तर सर्व साधारण नियमाप्रमाणे त्या रिक्थावर तिचा जेवढा हक्क आहे तेवढ्यापुर्तीच ती व्यवस्था टिकेल; जास्त टिकणार नाही. विधवेची पतीपासून आलेल्या स्थावरावर मरणापर्यंत अगर जेथें पुनर्विवाहाची योग्यता असेल तेथें पुनर्विवा ह होईपर्यंत मालकी आहे ह्मणून योग्य कारणाखेरीज तिनें जी व्यवस्था केली असेल, ती वरील दोन गोष्टी घडून येत तोपर्यंत टिकेल. योग्य कारणाशिवाय दत्तक घेणाऱ्या विधवेनें जर इस्टेटीची विल्हेवाट केली असेल तर ती दत्तविधानाच्या अगोदरची असली तरी त्या मुलास रद्द करता येईल. ४८ ( ४५२. ) परंतु योग्य कारण नसतांही जर विधवेने आपल्या मार्गे जे तिच्या नवऱ्याचे नजीकचे वारस असतील त्यांची संमति घेऊन वरील रिक्थाची व्यवस्था केली असेल तर ती कायदेशीर असून तिच्या मरणानंतरही कायम राहील. ४९ ( ४५३. ) विधवेनें जर स्थावर रिक्थाची कांहीं व्यवस्था नवऱ्याच्या वार गोकल चंदर, १३ मूँ. इं. अ. २०९; शिवाय पुढील ठराव पहावे:- त्रिलोचन वि. उमेशचंद्र ७ क० रि. पृ. ५७१; राजवल्लभ वि. उमेशचंदर रूझ इं. ला. रि ५क. ४४. ४५. बाबू कामेश्वर प्रसाद वि. रनबहादुर सिंग ला. रि. ८ ई० अ० पृ० ८ हनुमन प्रसाद पांडे वि. मुसामत बाबू इयनराजकुवारी ६ मू. इं. अ. पू. ३९३. ४६. गुरुनाथ वि० कृष्णाजी इं० ला० रि० ४ मुं. ४६२. ४७. चिमणाजी वि. दिनकर इं० ला० रि. ११ मुं. ३२०. ४८. लक्ष्मण भाऊ वि. राधाबाई ई० ला० रि० ११ मुं. ६०९. ४९. वरजीवन रंगजी वि, घेला गोकुळदास इं० ला० रि० ५ मुं. ५५३.