पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ८ स्वत्यनिवृत्ति. तर मृत्युपत्रानें जरी नवऱ्याने दिलेले असले तरी त्यावरील सत्ता नियमित आहे." तसेच वारसानें त्यापासून घेतलेल्या जंगम मिळकतीसंबंधानेंही तिची सत्ता स्थावराप्रमाणें निय मित आहे.. ( ४५०. ) विधवेला स्थावर रिक्थ योग्य कारणाशिवाय विकण्याचा अधिकार नाहीं, परंतु जंगम मिळकत तिणें पाहिजे त्या रीतीनें वहिवाटावी किंवा विकावी. परंतु स्त्रीधनाविषयीं ती पूर्ण मालक आहे. तिची नवऱ्याच्या इस्टेटेविरील वारशानें प्राप्त सत्ता नियंत्रित आहे व वारस नसेल तरी तो नियंत्रितपणा जात नाहीं. ते प्रतिबंध कधींच नष्ट होत नाहींत. ४२ (४५१.) आतां योग्य कारण ह्मणजे काय ? नवऱ्याची और्ध्वदेहिक क्रिया, महायात्रा, जिंदगी राखण्याचा खर्च, तसेंच नवऱ्याचे कर्जाची फेड, आपले पोषण, मुली अगर मुलाच्या मुली यांची लग्नें, व मुलाच्या मुंजी ही सर्व योग्य कारणे जाणावी: ( भा. २ पृ. १८९--१९३ पहा.) स्थावराचा कांही भाग जरूरीच्या कारणासाठी अगर धर्मकार्यासाठी विकण्याचा अधिकार आहे, तथापि त्या सर्वांचें दान वारसांच्या संमतीवांचून करतां येणार नाही. परंतु देशरिवाज व जुने फैसले निराळे होते. हिंदु विधवेला नवऱ्याच्या और्ध्वदेहिक क्रियेसाठीं, तिच्या स्वतःच्या पोषणासाठी, तसेंच काशीयात्रा वगैरे व नवऱ्याची श्राद्धे यांसाठी, व आपले स्वतःचे योग्य और्ध्वदेहिक क्रिये- साठीं जो पैसा लागेल तो कर्ज काढून त्याबद्दल नवऱ्याची जिंदगी गहाण टाकितां येते. नवऱ्याच्या स्थावर जिंदगीची जी विक्री विधवेनें केली असतां कायदेशीर नाहीं, तिला जर तिच्या वारसाची कबूली असेल तर ती कायदेशीर होईल. एका विधवेनें कांहीं जरूर नसतां अशी जिंदगी त्या वेळेस अगदी जवळची वारस एक मुलगी होती तिची कबुली घेऊन विकली.. पुढे जिवंत असतांच ती मुलगी विधवा मरण पावली.. अशा स्थितींत ही विक्री त्या मुलीची कबूली होती एवढ्यावरूनच अधिक लांबचे वारसाविरुद्ध कायदेशीर ठरणार नाहीं. ४ विधवेनें नवऱ्याच्या स्थावर जिंदगीचें गहाण अगर विक्री व ४३ ४४ ३९. हिराबाई वि० लक्ष्मीबाई ई० ला० रि० ११ मुं० ५७३. ४०. गदाधरभट्ट वि. चंद्रभागाबाई इं० ला. रि. १७ मुं. ६९०. ४१. धोंडो रामचंद्र वि. बाळकृष्ण गोविंद इं. ला. रि. ८ मुं. १९०; परंतु सौदामिनी वि. बंगालचे आडामनिस्ट्रेटर इं० ला० रि० २० क. ४३३ ह्यांत अर्से ठरले आहे की, वार्षिक उत्पन्नापैकी शिल्लक स हिलेला भाग जर ती इस्टेटींत जमा न करतां स्वतंत्र आपल्या हाती ठेवील तर त्याची इच्छेनुरूप विल्हेवाट करण्याचा तिला अधिकार आहे. ती सत्ता तहांहयात इस्टेटीवरच्या प्रमाणे नाहीं. इं. ला.. रि. ४ मुं. ४६२; ४ म. १५२; ९ क. २४४; ८. मुं. १९०; ला. रि. १६. इं. अ. १८६. ४२. भास्कर वि. महादेव ६ मुं. हा. को. रि. अपी. शा. १. ४३. सदाशिव भास्कर वि. धाकुबाई इं. ला. रि. ५ मुं. ४५०. ४४. इं० ला० रि० ५ मुं० ५६३: वरजीवन वि० घेला मोकुळदास. पहा राजलखी देवी वि.