पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४२ २० येते. हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ८ फक्त त्या हिश्शाची, तो हिस्सेदार जिवंत आहे तेथपर्यंत, कोर्टमार्फत विक्री करतां जीमूतवाहनाच्या दायभागाप्रमाणे एका हिस्सेदारास आपल्या हिश्शाचं पाहिजे ते करिता येते व तो मेल्यावर देखील त्याच्या कर्जाकरितां त्याचा हिस्सा कोर्टमार्फत विकतां येतो. ३२ ( ४४८. ) जेथे अनंश ह्मणून विभागासाठी फिर्याद आणतां येत नाहीं तेथें विक्रो रद्द करण्यासाठी फिर्याद आणतां येत नाहीं. एकदा फिर्याद आणून तो मेला तर ती मुलाला चालवितां येत नाहीं. 33 ॐ४ अविभक्त कुटुंबांत एकाचा विशिष्ट मिळकतींतील हिस्सा ज्याने घेतला असेल, त्याला तेवढाच तुकडा विभाग करून तोडून मागतां येत नाहीं. विभागाची फिर्याद आ- गली पाहिजे. एकानें एकाचा समाईक घरांतील हिस्सा विकत घेतला. विकावयाच्या व फिर्यादीच्या दरम्यान हिस्सेदार वाढले तर हिस्सेदारास हिस्सा फिर्यादीच्या तारखेच्या वेळच्या कुटुंबाच्या स्थितीप्रमाणे द्यावयाचा. ३५ 38 (४४९.) स्त्रीला आपलें स्त्रीधन वहिवाटण्याची व देण्याची पूर्ण सत्ता आहे याविषयी पूर्वीच्या प्रकरणांत जागजागी दर्शविलं आहे; व ती त्या द्रव्याची मृत्युपत्राने व्यवस्था करूं शकते; कारण जो कोणी जितकें आपल्या हयातीत देऊं शकतो तितकें तरी तो मृत्युपत्रानें देऊं शकतो. नवऱ्याने जे त्याच्या स्वतःच्या स्थावर इस्टेटीपैकी मृत्युपत्रानें तिला पूर्ण मालकीचें ह्मणून दिले असेल ते तिहाइतास दिलेल्याप्रमाणें तिच्या पूर्ण मालकीचें होतें व त्याची इच्छेनुरूप विल्हेवाट करण्याचा तीस अधिकार प्राप्त होतो. तसेंच जें जंगम तिला मृत्युपत्राने दिलेले असेल त्यासंबंधानेही आहे. तें पाहिजे त्यास ती मृत्युपत्रानें देऊ शकेल. असे पूर्ण मालकी दिल्याचे शब्द नसतील ३७ ३८ "विंददास ३०. इं. ला. रि. कल. वा. ५, पृ. १४८; इं. ला. रि. १६ क. १३७; १८ क. १५७ बालगो- वि. नारायणलाल इं० का० रि० १५ अ. ३३९. '३१. वरील ठराव पहा, व शिवाय टागोर बि. टागोरें, बं. ला. ला. रि. वा. ९ पृ. ३७७ पहा.

  • ३२. रामसाह्रै वि. काळालालजी इं. ला. रि. ८ क० १४९.

रामसुंदर वि. रामसहै इं. ला. रि. ८ क. ९१९. ३३. पदार्थसिंह वि. राजाराम इं० ला० रि० ४ अ. २३५. ३४. वेंकटराम वि. मिरालबाई इं० ला० रि० १३ म० २७५. ३५. रंगस्वामी वि. कृष्णायन इं० ला० रि० १४ म. ४७८. ३६. पहा मुं० इा० रि० वा.० ३, दिवाणी अपील शाखा, पु. ६ ३७. शेट मूळचंद वि. बाई मंचा इं० ला० रि० ७ मुं. ४९१. ३८. दामोदरदास माधवजी वि. परमानंददास इं० ला० रि० ७ मुं. १५५.