पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म० ८ स्वत्वनिवृत्ति. २४१ (४४७.) बंगाल व वायव्य इलाख्याच्या ज्या भागांतील लोक मिताक्षरे- रमाणे वागतात तेथें अविभक्त कुटुंबांतील हिस्सेदारांस आपला हिस्सा इतर हिस्सेदा- रांच्या संमतीशिवाय विकतां अगर गहाण देतां येत नाहीं, व बक्षीसही देतां येत नाहीं. अविभक्त कुटुंबांतील एक भागीदार निपुत्रिक वारला असतां त्याच्या त्या कुटुंबाचे समा- यिक जिंदगतील असणारा जो भिन्न न झालेला भाग तो त्या कुटुंबामध्ये त्याचे मागें जे भागीदार राहतात त्यांजकडेस जातो. तो त्या मयत भागीदाराचे विधवेस मिळकत नाहीं त्यानें आपणा स्वतःकरीतां जें कर्ज काढिलें असेल त्याबद्दल त्याचे विधवेवर वारस ह्म- णून जर निवाडा मिळविला तर त्या निवाड्याचे बजावणीस पात्र होत नाहीं. हा हिस्सा जर त्या कर्जाचे फेडीस पात्र करणेच आहे तर मयताचे मागे राहिलेले जे भागीदार यांज- वरच त्या कर्जाकरितां फिर्याद करावी व मयताचा मुलगा जर असता व त्यास त्याचा भाग जर दाय असा आला असता तर त्या भागास ज्याप्रमाणे या कर्जाच्या फेडीस पात्र करण्याची मागणी केली असती, त्याप्रमाणे त्या दुसऱ्या भागीदारांवर जी फिर्याद करणें त्यांत मागणी करावी. मिताक्षरेप्रमाणे बंगल्यांत अविभक्त कुटुंबां तील एका हिसेदारास दुसऱ्यांच्या अनुमोदनावांचून समायिक जिंदगीमधील आपला हिसा आपल्या स्वतंःकरितां कर्ज काढून गाहाण टाकितां येवो अगर न येवो; तथापि हें खचित आहे की, अशा हिशावर बजावणी करितां येते, व तो बजावणीत विकतां घेतो, आणि तो हिसेदार जिवंत असतांना सदरील प्रकारें त्याचा हिसा त्याच्या स्वतःच्या कर्जावरून मिळविलेल्या निवाड्याचे बजावणीत विकला असतां जो मनुष्य तो विकत घेतो त्यास त्या समायिक जिंदगीमधील हिशाचा हक्क प्राप्त होतो. तो हिसा त्याला वांटणीची फिर्याद आणून परिछिन्न करितां येतो आणि तो हिसेदार मयत हो- ण्याचे अगोदर जर बजावणीमध्ये त्याचा हिसा जप्त झाला असेल, परंतु त्या हिशाची विक्री झाली नसेल तर त्या जप्तीच्या योगानें त्या हिशावर सामयिक कुटुंबाची मालकी न होतां बजावणीदाराचा हक्क राहतो व त्या बजावणीअन्वयें जो तो हिसा विकत घेतो त्यास, तो हिसेदार विक्री होईपर्यंत जिवंत असता तर जो हक्क प्राप्त झाला असता, तोच प्राप्त होतो. २९ २८ २८. मुसामत फुलबास वि० लालाजोगेश्वर, ला० रि० ३ इं० अ० पृ० ७ पहा. फकिरप्पा वि० चनप्पा मुं० हा० रि० वा० १० पृ० १६२. आतां विक्रीसंबंधानें इं. का. रि. १२ क. ४७०, व १४ क. २४१ पहा. २९. सुरजघंसीकुवर वि० शिवप्रसादसिंग ला० रि० ६ इं० अ० ८८; ई० ला० रि० ४ क. ७२३ व ८०९. ह्याचेंच अनुकरण ह्या इलाख्यांत इं. ला. रि. १० मुं. ५४४, ५७०: ५७९; १२ मुं. ६२५ ब ६६१ ह्यांत झाले आहे.