पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ८ स्वत्वनिवृत्ति. २३९ ( ४४२. ) एका हिस्सेदारास सामान्यतः समायिक इस्टेटीपैकी आपला हिस्सा विकण्याचा अधिकार नाहीं, परंतु विशेष कारणासाठी त्याणे विकल्यास विकणाराच्या एकंदर हिशांतून तो विक्री पुरी केली पाहिजे असे पूर्वी मद्रासत ठरत असे. १३ १४ १५ 9E ( ४४३. ) अविभक्त कुटुंबामध्यें बहुतकरून कोणी तरी एक हिस्सेदार कुटुंबाचा कारभार पहाणारा असतो, त्यास कर्ता ह्मणतात. त्याणें व्यापार, कर्ज, वगैरे विशेष का- णाकरितां समाइक इस्टेटीचा कांहीं भाग विकला अगर गहाण टाकला, तर ती विक्री अगर गहाण कायदेशीर आहे. व्यापारांत विल्हेवाट करण्यास अधिकार आहे. परंतु मुदतीच्या बाहेर गेलेले कर्ज त्याला ताजें करतां येणार नाहीं. जेथें गहाणाने नुकसान अ सेल तेथे विकावयाला अधिकार आहे." बाप गैरहजर असला तर तेवढ्यानेंच त्याचा अधिकार मुलाकडेस येत नाहीं." विधवा वहिवाटदार असेल तर तिलाही अधिकार आहे." एका अ- विभक्त कुटुंबाच्या कर्त्याने आपल्या राखेच्या मुलीच्या पोषणासाठी समाईक द्रव्यांतून विकत घेतलेले एका गिरणीतले भाग एका इसमाजवळ दिले. तो वारल्यावर त्या मुलीनीं त्या भागावर आपला हक्क शाबीत व्हावा ह्मणून फिर्याद आणलो. जरूरीच्या कारणा- शिवाय दान झालें ह्मणून दावा रद्द झाला. २० ( ४४४.) मुंबई इलाख्यांत अविभक्त कुटुंबांतील एका हिसेदारास इतर हिसदा- रांच्या संमतीशिवाय आपला हिस्सा कोणास बक्षीस देतां येत नाहीं, अथवा मृत्युपत्र करूनही त्याची व्यवस्था करितां येत नाहीं." परंतु जर जिंदगी स्वकष्टार्जित असेल अथवा मालक एकटा असून निपुत्र असेल तर अशी देणगी मृत्युपत्रानें करितां येते. ( ४४५. ) परंतु हिस्सेदारास तो हिस्सा विकण्यास अगर गहाण टाकण्यास १३ म.० स० चे ठराव स्पे० अ० नं० १२३ व १८३ सन १८५९. १४. १ मुं० हा० को० रि० २७ व ३९: ई० ला० कल० वा० ५ पृ० ८४५, व तेच पुस्तक पृ० ७९२, यावरील ठराव पहा. छोटाराम वि० नारायणदास इं. ला. रि. ११ मुं. ६०५. १५. विमला वि० मोहन इं० ला० रि० ५ क० ७९२. सामलभाई वि० सोमेश्वर इं० ला० रि० ५ मु० ३८. हारुण महमदचा अर्ज इं० ला० रि० १४ मुं० १८९. १६. चिनाया वि० गुरुनाथ ई० ला० रि० ५ म० १६९. १७. हरनाथराय वि० रणधीरसिंह ला० रि० १८ इं० अ० १. १८. पटेल हरी वि० हुकूमचंद इं० ला० रि० १० मुं० ३६३. १९. ६ मुं० हा० रि० अपी० शा० १३१; मुं० हा० रि० २११. ६ मुं. इं. अ. ४१८. २०. पार्वती वि० गणपतराव इं० ला० रि० १८ मुं० १७७. २१. मुं० हा० रि० वा० ३ पृ० ६६ स्पे० अ० नं० ४८ सन १८६६. ६, पृ. २४९; ११, पृ. ७६; १२, पृ. २२९; ला. रि. ७ इं. अ. १५०.