पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण आठवें. स्वत्वनिवृत्तिः– देणे, विकणं, इत्यादि. ( ४३६.) ज्या वस्तूवर आपले स्वत्व नाहीं ती वस्तु दुसन्यास बक्षिस अथवा विकत वगैरे देण्यास आपणास अधिकार नाहीं.' याच न्यायानें पितामहार्जित स्थावर मिळकत असेल तर तीं पुत्र व पौत्र यांच्या अनुमतीशिवाय साधारण रीतीनें विक्रतां येत नाहीं.' विकावयाच्या वेळेस बायको गरोदर असून मुलगा होईल तर तो जिवंत असलेल्या मुलासमान मद्रास हायकोर्टानें धरून त्याच्या वतीनें विक्री रद्द होऊं शकेल असे ठरविलें आहे. अ ( ४३७.) परंतु जर अशा स्थलीं कुटुंबांतील कांहीं मुलगे अथवा भाऊ हे अज्ञान असतील, आणि जी विक्री केली ती त्यांच्या व कुटुंबाच्या हिताकरितां असेल, अथवा कुटुंबाच्या साधारण अडचणीकरितां ( जसें उदरनिर्वाहाकरितां अथवा समाईक कर्ज देण्याकरितां इत्यादि कारणांसाठी ) विक्री झाली असेल, तर ती चालेल; नाहीं तर चालणार नाही. दुराचरणासाठी कर्ज काढलेले नसेल तर त्यासाठी वडलार्जित स्थावर इ- स्टेटींतील मुलाचा हिस्सा बापास विकतां येतो.' ५ ( ४३८. ) ज्याप्रमाणे स्वकष्टार्जित मिळकत विकण्यास किंवा पाहिजे तशी तिची विल्हेवाट करण्यास बापाला पूर्ण अधिकार आहे, त्याप्रमाणे त्याला वडिलार्जित जंगम मि- ळकतीविषयींहि अधिकार आहे. तेवढ्या वारसांकडून मिळालेल्याबद्दल देखील असाच आहे. इं. ला. रि. १० मुं. ५२८. E ( ४३९. ) तसेच बापास आपल्या पूर्वीच्या कर्जाची फेड करण्यासाठीं अगर कु- टुंबाच्या गरजेसाठी वडिलार्जित स्थावर जिंदगी विकतां येते. याखेरीज बापाचा वडिलार्जित १. मिताक्षरा दत्ताप्रदानिक प्रकरण पहा. २. आग्रा सदर काटेर्टाचे रि० सन १८४६ पृ० २७५; सदर्लंड्स् बी० रि० वा ६ पृ० ७१ स्पे० अ० नं० ४१ सन १८६३ आणि पृ० ७४: स्पे० अ० नं० २६८९ सन १८६५. ३. सभापति वि० सोमसुंदर इं० ला० रि० १६ म० ७६. ४. सदर्लंड्स् बी० रि० वा० १ पृ० ९६ : स्पे० अ० नं ७५७ सन १८६४. ५. फकरिचंद वि० मोतीचंद इं० ला० रि० ७ मुं० ४३८. ६. हेज् हायकोर्ट रि० सन १८६३; पृ० २०५; रे० अ० नं० १८१ सन १८६०.