पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पोषण व पोष्य. २३५ (४३०.) नवऱ्याच्या घरांत स्त्रीला राहण्यास जागा दिली पाहिजे, आणि घ राची वांटणी झाली तर मयताच्या विधवेस त्यांत तिला जागा ठेविली पाहिजे. ७५ ( ४३१.) सावत्र आईला रिक्य नसेल तर अन्नवस्त्र मिळावे की नाहीं या- विषयीं संशय होता; कारण, “वृद्धौ च मातापितरौ साध्वी भार्या शिशुः सुतः । अप्यका- र्यशतं कृत्वा भर्तव्या मनुरब्रवीत् " || ह्यांत तिचा समावेश होत नाहीं; परंतु याविषयीं स. वी. रि. फुलकोर्ट वा. १०, पृ. ९३ यावरील ठराव पहा. परंतु आतां असें ठरलें आहे की, समाईक इस्टेट असल्याशिवाय सावत्रआईला पोसण्याचा कायदेशीर बोजा नाहीं. ६ मुलगे व सावत्र मुलगे यांच्या दरम्यान विभाग होईल तेव्हां विधवेच्या अन्नवस्त्राचा बोजा सर्व इस्टेटीवर पडणार नाहीं; फक्त मुलाच्या हिश्यावर पडेल. " ७६ ७७ प्र० ७ ( ४३२.) सासूविषयींही वरील ठराव व कुपमाल वि० रुक्मिणी, मद्रासचे ठराव स. १८५५, पृ. २३८ हे पहा. याविषयीं तर कोठं आधार दिसत नाहीं. ( ४३३. ) पोषणासाठी दिलेल्या इस्टेटीची, तसा उद्देश नसेल तर, हयातीपेक्षां जास्त टिकेल अशी विल्हेवाट करतां येत नाहीं. तो उद्देश ज्यास दिली त्यानें शावीत केला पाहिजे. तो मेल्यावर परत घेतां येतें. देणाऱ्याच्या खुषीनें परत घेतां येईल असे असूं शकेल: ( ला. रि. १० इं. अ. १३३. ) ७८ (४३४.) स्वतःच्या कृत्यानें जर इस्टेटीची किंमत कमी होईल तर त्या सबबीवर अन्नवस्त्राची रक्कम कमी होणार नाहीं. ७९ ८० ( ४३५.) हिंदु विधवेचा अन्नवस्त्राच्या हक्काचा बोजा तो हक्क माहीत नसतां इ स्टेटीचा भाग विकत घेणाऱ्यांवर पडत नाहीं. अगोदरच्या गहाणावर त्याचा बोजा पडत नाहीं, परंतु ज्या घरांत ती रहात असेल त्यावर जर गहाणाचा बोजा असेल तर, व तें जर त्या गहाणाच्या हुकुमनाम्यानें विकले जाईल तर, त्यावर तिच्या हक्काचा बोजा पडेल 9 तिला वारसाच्या हातांतील इस्टेटीपैकी काही भागावर बोजा ठेवन घेतां येतो. ८२ विधवा तेथें राहते व पोसली जाते हैं माहीत असून वारसापासून घर विकत घेतले असेल तर त्यांतून, तिला दुसरी इस्टेट पोसण्यासारखी वारसाजवळ असली तरी, का- ७५. मंगलादेवी वि० बोस, बं० ला० रि० ( अ० दि० शाखा ) पृ० ७२; गौरी वि० चंद्रमणी इं० मा० रि० आला० वा० १ पृ० २६२. ७६. बाईदया वि० नाथागोविंदलाल इं० ला० रि० ९ मुं० २७९. ७७. केदारनाथ वि० हेमांगिनी दासी इं० ला० रि० १३ क० ३३६. ७८. गणपतराव वि रामचंद्र इं० ला० रि० ११ अ० २९०. इं. ला. रि. ४. म. १९३; ५क. ११३; १० अ. ४२२. ७९. विजय वि० श्रीपति इं० ला० रि० ८ म० ९४. (नाहीं तर होईल: इं. ला. रि. १ अ. ५९४.). ८०. सुरजाकुवर वि० नाथबक्ष इं० ला० रि० १९क० १०२. ८१. वेंकटामल वि० आडव्याप्पा इं० ला० रि० ६ म० १३०.. ८२. महालक्षम्मा वि० वेंकटरत्नम्मा ई० ला० रि० ६ म० ८३.