पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३४ हिन्दुधर्मशास्त्र. ६७ हुकुमनामा वारंवार फिर्याद आणून बजाविला पाहिजे. अन्नवस्त्राची बाकी राहिली असेल तर तें कर्ज होतें व जिला मिळावयाचें तिच्यावर हुकुमनामा झाला तर ती रक्कम हुकुमनामेवाल्याला वसूल करून घेतां येते. परंतु तिला जें अन्नवस्त्रासाठी स्थावर दिलेलें असेल ते तिच्या विरुद्ध हुकुमनाम्यानें जप्त करून विकतां येत नाहीं. ९ प्र० ७ (४२७.) बापानें मुलाचें पोषण तो बाल आहे तोपर्यंत ह्मणजे सोळा वर्षांचा होईपर्यंत केले पाहिजे. त्यापुढे मुलाला बापापासून पोटगी मागतां येणार नाहीं. ७० ( ४२८.) नवण्याच्या पश्चात् विधवेला पोटगी मिळणं ती विधवा साध्वी असेल तेथपर्यंत मिळावी असा धर्मशास्त्राचा आशय दिसतो. हुकुमनामा मिळविलेला असेल तर तो पश्चात् घडलेल्या दुराचाराच्या पुराव्याने निराळा दावा आणून, अथवा विधवेनें आणलेल्या दाव्याच्या उत्तरपक्षाच्या वेळच्या पुराव्यानें रद्द अथवा तकूव होऊ शकेल. परंतु ही गोष्ट पुत्रांव्यतिरिक्त अन्य दायादांपासून पोटगी मागण्याच्या वेळी मात्र लागू आहे. ७१ (४२८ अ.) अन्नवस्त्राची फिर्याद स्मालकाजुकोर्टात होत नाहीं." (अ) तशीच अन्न- वस्त्राचा स्थावरावर बोजा ठेवणाऱ्या हुकुमनाम्यावरून आणलेली फिर्यादही स्मालकाज कोर्टात चालत नाहीं. हाच नियम अन्नवस्त्राचा करार केला असेल त्याअन्वयें रा- हिलेल्या बाकीबद्दलच्या फिर्यादीला लागू आहे. हा ठराव प्रान्तिक स्मालकोर्टाच्या आक्टा- खाली आहे. ७२ ७३ (४२९.) साध्वी स्त्रीला नवऱ्याने टाकून दिली असेल आणि नवऱ्याची जिंदगी असेल, तर त्यांतून पर्यंत तिच्या पोषणार्थ दिले पाहिजे. ७४ ६७. रामदयाळ वि० इंद्रकुवर इं० ला० रि० १६ अ० १८०. ६८. राजेराव चंद्रराव वि० नानाराव इं० ला० रि० ११ मुं० ५२८. ६९. गुलाबकुवर वि० बनसीधर इं० ला० रि० १५ अ० ३७१. • ७०. यासंबंधानें मुं० हा० रि० व्हा० १२ पा० ९४; ई० ला० रि० मुं० व्हा० २ पा० ३४६, हे ठराव पहावे. ७१. विष्णुशांभोग वि० मंजामा इं० ला० रि० ९ मुं० १०८. दौलताकुमारी वि० मेधूतिवारी इं० ला० रि० १५ अ० ३८२. ७१. (अ) इं० ला० रि० मुं० वा० २ पृ० ६२४ आणि ६३२. ७२. धरमचंद वि० जानकी इं० ला० रि० ५ अ० ३८९. ७३. भगवंतराव वि० गणपतराव ई० ला० रि० १६ मुं० २६७. ७४. रमाबाई वि० त्रिंबक मुं० हा० रि० बा० ९पृ० २८३.