पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ७ पोषण व पोष्य. २३३ तो मनुष्य बुद्धिपूर्वक हयगय करिल तर ज्या महिन्याची नेमणूक त्याणें दिली नाहीं तशा हरएक महिन्याची नेमणूक दण्ड वसूल करण्याची जी रीत सांगितली आहे त्या रीतीनें वसूल करण्याविषयी वारंट करण्याचा अखत्यार मार्गे सांगितलेल्या माजिस्त्रेटास अ- गर दुसऱ्या कामगारास आहे किंवा एक महिन्याहून अधिक नाहीं अशा कोणत्याही मुद तीपर्यंत सक्तमजुरीसुद्धां अगर तीवांचून त्या मनुष्यास कैद करण्याविषयी हुकूम करण्याचा अखत्यार त्याला आहे. परंतु माझी बायको मजबरोबर राहील तर तिचें पोषण मी करीन असे तो मनुष्य ह्मणत असून त्याची बायको त्याजबरोबर राहण्यास नाकबूल होईल तर नाकबूल होण्याची कारणें बायकोच सांगेल त्यांचा विचार करण्याचा अधिकार मार्ग सां- गितलेल्या माजिस्त्रेटास अगर दुसऱ्या कामगारास आहे; आणि तो मनुष्य जारकर्म करीत असतो किंवा आपल्या बायकोला त्याणे क्रूरपणानें नेहमीं वागविलं आहे अशी त्या माजिस्त्रे- टाची अगर त्या दुसऱ्या कामगाराची खात्री झाली तर तो मनुष्य वर सांगितल्याप्रमाणे ह्मणत आहे तरी ह्या कलमांत सांगितलेला हुकूम करण्याचा अखत्यार त्यास आहे. कोणी बायको बदकर्म करीत असेल अगर योग्य कारण नसतां ती आपल्या भ्रताराबरोबर राह- ण्यास नाकबूल असेल तर ह्या कलमाच्या आधाराने आपल्या भ्रतारापासूत नेमणूक घेण्याचा हक्क तशा कोणत्याही बायकोला नाहीं. " ( ४२९.) सन १८८२ चा आक्ट १० बाब ३६ वरून आतांही तसाच ठराव व्हावा असे दिसतें. कलम ४८८ ह्याखाली हुकुम करतेवेळी माजिस्ट्रेटांनी फिर्यादी ज्यापासून अन्नवस्त्र मागते त्याची बायको आहे, व त्यानें तिला पोसण्याच्या कामांत हय- गय केली आहे अथवा नाकारले आहे असें ठरविले पाहिजे. 83 ६४ (४२६.) एकदा अन्नवस्त्राचा निवाडा झाला ह्मणजे त्यावरून वर्षावर्षास फिर्या- दोचें नर्वे कारण उत्पन्न होतें; आणि त्याच्या आधारानें दावा आणला असतां मागील १२ वर्षीचे उत्पन्न देववितां येईल. ह्यासाठी नवी फिर्याद नको. हुकुमनाम्याच्या बजावणीत काम होईल, असें कलकत्ता हायकोर्ट ह्मणतें." परंतु मुंबईचें ह्मणतें कीं, अमूक रक्कम अन्नवस्त्राबद्दल द्यावी असा हुकुमनामा झाला तर ती वसूल करण्यास दरसाल दावा आणला पाहिजे. हुकुमनाम्याच्या बजावणीनें भागणार नाहीं. ६ एका कज्यांत असा हुकुमनामा झाला कीं, चादीस दाव्याच्या अगोदरच्या एका वर्षाचे मागणे द्यावें, व पुढलाही हक्क देवविला; परंतु कोणत्या तारखेस रक्कम दिली पाहिजे हें ठरविलें नाहीं. ठराव असा झाला कीं, असा ६३. गुलाबदास भाईदास याचा अर्ज; इं० ला० रि० १६ मुं० २६९. ६४. कलकत्ता सदर दिवाणी अदालतीच रिपोर्ट, वा० ८ पृ० ५१७. ६५. आशुतोष वि० लखीमणी इं० ला० रि० १९क० १३९. नुसता हक्क शाबीत करणारा हुकु- मनामा बजावतां येत नाहीं. ( इं. ला. रि. १२ मुं. १८३ ). ६६. विष्णुशांभाग वि० मंजामा ई० ला० रि०९ मुं० १०८. ( मुदतीच्या संबंधानें इं. का. रि. १२ मुं. ६५ पहा).