पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३२ हिन्दुधर्मशास्त्र. मालकाचा सबब अशी तकरार केली कीं, चुलत्यास जी नेमणूक पूर्वी मिळत होती ती तो गादीच्या भाऊ असल्यामुळे मिळत होती. आतां तो दूरचा झाला नेमणूक कमी करावी. तशी नेमणूक कमी करण्याची चाल शाबीत न झाल्यामुळे बंगा- लच्या हायकोर्टानें पुतण्याचें ह्मणणें नाकबूल केलें. " ( ४२१. ) सदरप्रमाणें या इलाख्यांत पुष्कळ वतनदारांची स्थिति आहे. समाईक घन अविभाज्य असल्यामुळे ज्यांना पोटगी द्यावी लागते त्यांचे इतर पोटगीदारांप्रमाणे हक्क जात नाहीतः ( पाहा. मुं. हा. रि. व्हा. १२ पा. २३४ ) ( ४२२. ) अन्नवस्त्राच्या फिर्यादीच्या मुदतीविषयीं सन १८७७ चा आक्ट नं- १५, परिशिष्ट २, रकम १२८, १२९ लागू आहेत; परंतु जेथें मयताच्या इस्टेटींतून अन्नवस्त्र मागावयाचें असेल तेथे मात्र ती लागू पडते, सर्वच कज्जांस लागू नाहीं. तसेंच अन्नवस्त्राची जरूर पडून मागितलें असतां दिलें नाहीं, ह्मणजे त्या वेळी अन्नवस्त्राचा दावा करण्याचे कारण साधारण रीतीनें उत्पन्न होते असा ठराव मुंबई हायकोर्टानें केला आहे. जेथे योग्य कारणासाठी विधवा निराळी राहील तेथें बाकी नाकारतां येईल. ६० ६० प्र० ७ ( ४२३. ) जेथें हयात पुरुषांच्या इस्टेटींतून अन्नवस्त्र मागावयाचें असेल तेथें व रील रकम लागू होत नाहीं." जरी नवश मरून १२ वर्षे झाली असली तरी चिंता नाही. ६२ ( ४२४.) सन १८६१ चा आक्ट २५ कलम ३१६ यांतील ठरावावरून दिवाणी कोर्टात अन्नवस्त्र मागण्याचा जो बायकोस हक्क आहे तो रद्द होत नाहीं असा ठराव बंगालच्या हायकोर्टानें केला आहे. सदरहू कलम खाली लिहिल्याप्रमाणे आहे:- "कोणा मनुष्याला पुरती ऐपत असून तो आपल्या बायकोचें अगर ज्यास आपले पोषण करण्याचें सामर्थ्य नाहीं अशा आपल्या लग्नाच्या बायकोच्या पोटी झालेल्या किंवा दुसऱ्या बायकोच्या पोटी झालेल्या आपल्या मुलाचें पोषण करण्याविषयीं हयगय करील अगर नाकबूल होईल, तर त्याचा योग्य पुरावा झाल्यावर त्याच्या त्या बायकोच्या अगर त्याच्या तशा मुलाच्या पोषणाकरितां महिन्यास एकंदर पन्नास रुपयांहून अधिक नाही अशी जी नेमणूक जिल्ह्याच्या माजित्रेटास अगर माजिबेटाचा अधिकार चालविणाऱ्या दुसऱ्या कामगा- रास योग्य वाटेल ती महिन्याची नेमणूक करून देण्याविषयी हुकूम करण्याचा अधिकार मार्गे सांगितलेल्या माजिस्त्रेटास अगर दुसऱ्या कामगारास आहे आणि तो हुकूम मानण्याविषयीं ५९. सदर्लंड्स् वी. रि. वा. ६ पृ. ९१ स्पे. अ. नं. ८०६ सन १८६६. ६०. स्पे. अ. नं. १०४१ स. १८६४ फडशा ता. २८ जून सन १८६५. ६० (अ.) रंगो वि. यमुनाबाई इं. ला. रि. ३ मुं. ४४ इं. ला. रि. ५ मुं. ९९ पहा. मुदतीची हरकत नसेल तर पाहिजे तितक्या वर्षांची बाकी नाकारलेली नसली तरी मागतां येईल इं. ला. रि. ३ मुं. २०७. ६१. सदर्लंड्स वी. रि. वा. ४ पृ. ८४, स्पे. अ. नं. १७८८ सन १८६५. ६२. सदर्लंड्स बी. रि. वा. ६ पृ. ५७ स्पे. अ. न. ३४६२ सन् १८६५.