पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शास्त्राचे उगम. 66 - आहे. मनुस्मृतीस विरुद्ध जी स्मृति ती नाश पावते (ह्मणजे बाधित होते. ) यात्रविषयी वेदांत खाली लिहिल्याप्रमाणे सांगितलें आहे: – “ यद्वैकिञ्चमनुरवद- तद्भेषजम् "१८ अर्थ:-जे मनु बोलला, तें औषध आहे. मनूच्या खालोखाल याज्ञवल्क्य स्मृति सांप्रत मानतात; व त्यांतूनही या स्मृतीवर विज्ञानेश्वर नांवाच्या सन्याशानें उत्तर हिंदुस्थानामध्ये राहून मिताक्षरा ह्मणून जी टीका केली आहे, तिचें मान न्यायाच्या कोर्टात विशेष आहे. O - ( १३. ) ह्याचें मुख्य कारण प्रथम मन्वर्थमुक्तावली व मिताक्षरा ह्यांची सरकारांतून प्रसिद्धि झाली. तसेंच ह्या इलाँख्यांत व्यवहारमयूख स १८२५ सांत सुरतेत छापला व त्याचें भाषांतर अहंमदनगर येथें छापलें. तसेंच कलकत्त्यांस दत्तकमीमांसा व दत्तकच- न्द्रिका हे ग्रंथ मि० सदरलंड ह्यानें छापिले, व इतकेच इंग्रजीत प्रथम प्रसिद्ध झाले न तेच इंग्रजी न्यायाधीश पाहूं लागले. वस्तुतः स० १८६३ पर्यंत शास्त्री कोर्टातून होते तोपर्यंत सर्व ग्रंथ पहात असत; तथापि ज्यांची भाषांतरें झाली होतीं त्यांचे प्राबल्य वाढत गेलें. स० १८२६-२७ साली मि० स्टीलं ह्यांनी पुण्याच्या जवळचे प्रांत ह्यांतील हिंदूंच्या चालींविषयीं ग्रंथ प्रसिद्ध केला तेव्हां सरकारच्या आश्रयानें चौकशी झाली. ठिकठिकाणच्या जातींच्या लोकांजवळ तपास करून देशरिवाज कोणते चालू आहेत त्यांची त्यांची माहिती जमविली. त्यावरून त्यांनी जो ग्रंथ प्रसिद्ध केला आहे त्यांत आहे कीं, .विश्वेश्वरकृत मदनपारिजात हा फार प्रसिद्ध ग्रंथ आहे; आणि सुबोधिनी, जिचे २० ---- २१ वर्षीच्या आंत न्यायाधीशांनी विशेष महत्व मानिलें आहे, ती पुण्यांत १८२० पर्यंत नांवानें मात्र माहित होती. आतां मदनपारिजात हा ग्रंथ लोकांत प्रसिद्ध व मान्य असून त्याचें भाषान्तर नसल्यामुळे पुष्कळ न्यायाधीशांस नांवही समजत नाहीं.' १९ ( १४.) पुण्यामध्ये मिळण्याजोगे मि० स्टील यानें सांगितलेले धर्मशास्त्रावरचे ग्रंथां- ची यादी वर सांगितलेल्या ग्रंथावरून उतरून कांही टिप्पणीसुद्धां तयार केली आहे. ती येणेंप्रमाणे :-- अशौचनिर्णय. अशौचशेखर. अर्चाशुद्धि. आश्वलायनभाष्य. आश्वलायनकारिकाभाष्य शंकराचार्यांनी केलेलें. आश्वलायनवृत्ति. आश्वलायनवृत्ति, निराळा ग्रंथ. १८. “ यद्वैकिञ्चन मनुरवंदत्तद्भेषजम् " असाही कोठें पाठ आहेः १९. मि० स्टील ह्यांच्या वेळीं ज्या पुण्यांत वगैरे ग्रंथांच्या यादी झाल्या त्यांची यादी खाली दिली आहे. ह्याविषयीं आणखी विचार पाहणे असेल तर माझ्या इंग्रजी ग्रंथाचा उपोद्घात, पृष्ठे५९-७४ह्यांत पहावा,