पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० २ 66 पुराण “ मन्वादिस्मृतयो याश्चपटत्रिंशत्परिकीर्तिताः "." या वाक्यांत उपस्मृतीचेही स्मृतिशब्दानेंच परिगणन केलेले आहे. आतां वृद्धमनु, वृद्धवसिष्ठ, वृद्धशातप, लघुहारीत, योगियांज्ञवल्क्य, इत्यादि स्मृतिकार ग्रंथांतरी आढळतात. ते पूर्वी सांगितलेल्या मन्वादि स्मृतिकारांहून भिन्न आहेत असें नाहीं. तर त्या त्या अवस्थेत असतां त्यांणी जे जे ग्रंथ केले त्याप्रमाणे त्यांस नांवें दिलेली आहेत, असें वीरमित्रोदय ग्रंथी लिहिलेले आहे.' १६ वर सांगितल्या त्यांशिवाय माधव, बोपदेव, वैजनाथ, इत्यादि ग्रंथकार अन्य स्मृति- ही वर्णितात. सर्व स्मृतीत आचार, व्यवहार, प्रायश्चित्त, हीं तिन्ही प्रकरणे नसतात. कांहीत एक, कांहीत दोन; क्वचित् तीनही असतात. मनु, याज्ञवल्क्य, कात्यायन, व नारद, यांत व्यवहाराचा विचार विशेष आहे. गौतम, बृहस्पति, विष्णु, इत्यादि स्मृतीत संक्षिप्त वर्णन आहे. महाभारतांत धर्मशास्त्राविषयीं बरीच व्याख्या आहे, आणि यास पांचवा वेद अशीही संज्ञा आहे.. ( १२ ) वेदाच्या मागून सर्व स्मृतींमध्ये मनुस्मृती फार प्राचीन असून तिला कांही अंशी वेदासारिखाच मान देतात. याविषयी प्रयोगपारिजात ग्रंथों संस्कारकाण्डांत पुढील वाक्यें सांगितलेली आहेत:-- . १७ यत्पूर्वमनुनाप्रोक्तं धर्मशास्त्रमनुत्तमं || नहितत्समतिक्राम्यंवचनंहितमात्मनः॥ ६१॥ वेदादुपनिबद्धत्वात्प्राधान्यंतुमनुस्मृतेः ॥ मन्वर्थविपरीतातुयास्मृतिःसाविनश्यति ¨॥” अर्थः- जें. पूर्वी मनूनें अत्युत्तम धर्मशास्त्र सांगितले आहे त्याचे उल्लंघन करणारें जें वचन तें आपल्यास हितकारक नाहीं; वेदापासून ती बांधली आहे, यास्तव मनुस्मृति प्रधान १५. अर्थ:-" मन्वादि छत्तीस स्मृति सांगितल्या आहेत;" व यावरूनच कोठें कोठें “षट्त्रिंशन्मते” ह्मणजे “ ३६ सांच्या मर्ते, " अशा स्मृतिमंथांचा उल्लेख येत असतो. १६ वरील लेख ग्रंथकारानें कोणत्या आधारावरून लिहिला है. समजत नाहीं, परंतु मनु आणि वृद्धमनु, वसिष्ठ आणि बृद्धवसिष्ठ, हारीत आणि लघुहारीत इत्यादि ग्रंथंकार एकच होते असे झणण्या- पेक्षां, हेरौं पृथक् होते अर्से ह्मणणे योग्य दिसतें, कारण जर वृद्धमनुस्मृति व मनुस्मृति या, एकाच ग्रंथ- काराने केलेल्या असत्या, तर त्या परस्परांचा संबंध ग्रंथकारानें कांहीं तरी दाखविला असता. तसे कोर्डे आढळत नाहीं. . शिवाय एकच स्मृति एका ग्रंथकाराने वृद्धमनूची ह्मणून व दुसऱ्यार्ने बृहन्मनूची ह्मणून घेतलेळी आढळते. यावरून 'वृद्ध' व 'बृहत्' हे शब्द समानार्थं दिसतात. 'वृद्धशातातप' स्मृतींत स्मृतिकाराचे स्वतंत्र नांव वृद्धशातातप असे आढळते. (पहा मोठ्या ग्रंथाचा उपोद्घात पर्ने २३-२५ ) यावरून ते पृथक् असावे असे दिसतें. १७. प्रत्यक्ष वेदापासून त्या त्या विषयांचे स्मरण करून मनुस्मृति केळी आणि इतर स्मृति प् शाखांचे स्मरण करून केल्या यास्तव प्रत्यक्ष श्रुतिमूलक जी मनुस्मृति, ती अनुमित श्रुतिमूलक ज्या • इतर स्मृति त्यांपेक्षां प्रधान आहेत असा या वाक्याचा आशय दिसतो.