पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पोषण पोष्य. ( ४१८.) शूद्राला राखपासून पुत्र झाला असल्यास, त्यास जर दाय मिळाला नाहीं तर बापाच्या इस्टेटीतून अन्नवस्त्र मागण्याचा हक्क आहे." शूद्राला व्यभिचारिणी- पासून पुत्र झाला असेल तर त्याला त्या शूद्राच्या मिळकतींतून अन्नवस्त्र मिळेल. अ क्ष- त्रियांत शुद्र स्त्रीपासून जी संतति झाली असेल तिला वारस पोंचत नाहीं व त्याचप्रमाणे अन्य द्विजवर्णांत आहे ह्मणून बंगाल्यांत रामनगरच्या जमीनदारीचा तंटा पडल्यावर असा ठराव झाला की, मयत हा जातीचा राजपूत असून क्षत्रिय होता, ह्मणून अपिलेंट हा त्याचा दासीपुत्र आहे आणि तो अनंश आहे; यास्तव त्याचा वारशाचा दावा रद्द करून त्यास सालाचें ६००० रुपयांचें उत्पन्न पोटगीसाठी दिलें. ह्या कज्यांत पुष्कळ प्रमाणांवरून क्षत्रिय नष्ट झाले नाहींत असें ठरविले आहे. ५४ ५५ (४१९.) पूर्वी, षण्ढ, पतित, पांगळा, उन्मत्त, अज्ञान, आंधळा, " असाध्य रोगग्रस्त, इत्यादिकांस वारशाचा हक्क नाही असे सांगितले आहे. या सर्वांस अन्नाच्छादन दिलें पाहिजे. तसेंच त्यांच्या बायकांना अन्नाच्छादन दिले पाहिजे व त्यांच्या मु लांचे संस्कार केले पाहिजेत. अनंश हिस्सेदाराच्या विधवेच्या अन्नवस्त्राचा बोजा कुटुं- बाच्या इस्टेटीवर पडत नाहीं व त्यासाठींच्या हुकुमनाम्यानें ज्या ज्या वेळीं जो वहिवाटदार असेल तो बांधला जातो असें नाहीं. "" पुनर्विवाह केलेली अथवा दुसऱ्याजवळ रा- हणारी विधवा आपल्या नवऱ्याची इस्टेट अन्नवस्त्रासाठी विकावयाला असमर्थ होतेच अ नाहीं." ५७ ५८ प्र० ७ ( ४२०. ) पूर्वी सांगितले आहे कीं, हिंदुस्थानामध्यें कितीएक जमीनदाया व राज्यें यांचे विभाग न होतां, मालकी एकासच मिळते. तसें झालें ह्मणजे अर्थातच त्या कुटुंबांतील बाकीचे लोक अन्नवस्त्राचे मालक होतात.* ·५८अ याप्रमाणें बंगाल इलाख्यांत एका जमीनदाराच्या भावास साठ रुपये दरमहा अन्नवस्त्राबद्दल मिळत होते. पुढे तो जमीनदार मरण पावल्यावर गादीचा मालक त्याचा मुलगा झाला. तेव्हां त्याणे रंतरचा भाडोत्री होऊ शकत नाहीं. तशांत मूळचे प्रतिवादी हे अनौरसपुत्र आहेत; तर हिंदुशास्त्राप्र माणे त्यांचा निर्वाहाचा मात्र हक्क पोचतो; व ज्यापेक्षा तंट्यांतील जमीन वडिलार्जित आहे त्यापेक्षां ती अनौरस पुत्रांना वंशपरंपरेनें भोगण्यास बक्षीस करणे हे शास्त्रविरुद्ध आहे; सबब सि. अ. जज्जाचा निवाडा रद्द करून मुनासफ याचा बहाल ठेविला. ५२. मद्रास हा. रिपोर्ट वा. २ पृ. २९३ स्पे. अ. नं. २९७ सन १८६४. ५३. इं. ला. रि. म. व्हा. ३ पा. ३०६. ५४. चौतुऱ्या राणमर्दणसिंह बि. साहेब प्रल्हादसिंह, मू. इं. अ. वा. ७ पृ. १८. ५५. बा. रि. वा. १ पृ. ४११ ता. १२ मार्च सन १८१७. ५६. व्य. म. भा. भा. २ पृ. २१६-१७. ५७. मुतीया वि. वीरमल इं. ला. रि. १० म. ८७. ५८. अमजादाअल्ली वि. मणीराम कोलीता इं. ला. रि. १२ क. ५२. ५८ (अ.) रामचंद्र वि० सखाराम इं. ला. रि. २ मुं. ३४६.