पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दु धर्मशास्त्र. अन्नवस्त्राशिवाय दुसरा कशाचा हक्क नाहीं, सबब त्यास दिलेली जमीन पुतण्यास परत ५१ देवविली. " २३० प्र०७ ५१. मुं द्दा. रि. वा. १ पृ. १९१. याचप्रमाणे खाली लिहिलेला ठराव ता. ९ आगष्ट सन १८६६ रोजी मुंबईच्या हायकोर्टानें केलाः- स्पे. अ. नं. ४७९ स. १८६५ मा. कृ. पित्रे व वा. धों. पित्रे, स्पे. अ.; पांडू सिंदा व दुसरे स्पे. रिं.; दावा रुपये ४३१२-८-०. वादी नारायण धोंडभट्ट व महादेव कृष्णभट्ट यांचे फिर्यादींत हांशील कीं, जिल्हा रत्नागिरी, • तालुका विजयदुर्ग, मौजे कासर्डे, तर्फ खारेपाटण, हा दरोबस्त गांव आह्मांस इनाम असोन त्याची वहिवाट आह्मांकडे चालत आहे. त्या गांवापैकी वाडी देउळकर या नांवाची खासगत वतनी खंडखोताची आहे, तिची सदर जमा सन १८६२ सालाबद्दल आह्मांस नक्की उत्पन्न मिळण्याचे रुपये २२५ अजमा- साची किंमत रुपये १०००. ही वाडी नं. १ व नं. २ चा मयत प्रतिवादी हे आमचे बंदे चाकर, सबब त्यांजला वाडींत शेत करणारी कुळे यांजकडील वसूल करण्याचे काम आमचे वडील मयत आणि आम अज्ञान सबब सुमारें दहा अकरा वर्षे होतील ते हां प्रतिवादी यांजला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनीं वसूल सन १८५९-६० पर्यंत दिला. पुढे बसूल न देतां चालू बहिवाटीच्या जोरानें बहिवाट आह्मांकडे चालूं देत नाहींत सबब फिर्याद. कैफियत प्रतिवादी विश्राम, व राघो मयत याची वारस बायको जानकी, यांनीं निशाणी ६ ची दिल्ह्यांत हांशील की मौजे कासर्डे हा गांव इनाम संपादन करणार, हरभट्ट बिन गोविंदभट्ट, यांनी आमीं त्यांचे पोटचे लेकवळे सबब देउळकरवाडी ही सुमारें पन्नास वर्षे होतील तेव्हां त्यांनी आमचे निर्वाहाकरितां आमांस देऊन, त्याबद्दल कायम स्वामित्वाचे, घरच्या देवाच्या खर्चाकरितां निरंतर, सालदरसाल १० मण गल्ला व नक्त रुपये ५ आह्मीं त्यांजला देत जावे, याप्रमाणे ठरावून दिले. त्या प्रमाणे आजवर आह्मीं वहिवाट करून ठरविलेला इक्क इनामदार यास आदा करीत असतां, त्या वाडींत तीन हजार रूपये खर्च करून पाट बांधून शेत करून जमीन भरदारीस आणली, सचत्र बादीनें लोभानें मतलबी फिर्याद केली आहे. ठरविलेलें स्वामित्व देत आल्याप्रमाणे पुढे निरंतर देण्यास आह्मीं कबूल आहो. मालवणचे मुनसिफानें वादीचा दावा देवविला, आणि प्रतिवादींची तक्रार खोटी अर्से ठरविलें. त्या ठरावावर प्रतिवादींनीं अपील केल्यावरून, रत्नागिरी येथील सि. अ. जज्जानें मुनसिफाचा निवाडा फिरवून ठराव केला की, जरी या कामांत बक्षिसाचा लेख नाहीं तरी बहुतकाळ भाग्य आहे त्यावरून प्रतिवादाच्या उदरनिर्वाहार्थ ही जमीन दिल्याची शाबिदी समजली पाहिजे, ह्मणून प्रतिवादी हे निरंतर मक्तेदार ठरवून त्यांच्या ह्मणण्याप्रमाणे मक्ता मात्र वादीस देवविला. त्यावर वादींनी स्पेशल अपील केले. त्यावरून हायकोर्टानें केला तो ठराव:- वादीची फिर्याद वाडीदेऊळकर या वाडर्डाचा कबजा घेण्याची असून, ती वाडी निरंतरच्या सान्यानें वाहणारी आह्मीं कुळे आहों, व ती आमच्या निर्वाहाकरितां दिलेली आहे अशी प्रतिवादींची तक्रार आहे. अक्टिंग सि. अ. जज्ज यानें प्रतिवादींची वहिवाट फार दिवस, आणि ते भार्डे देतात सबब ते निरंतरचे भाडोत्री आहेत, असा ठराव केला; परंतु असा ठराव करण्यास मजबूद पुरावा पाहिजे तसा या मकदम्यांत मुळीच नाहीं. पुष्कळ दिवस सारा देऊन वहिवाट केली असतां तेवढ्यावरूनच नि-