पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२४ हिन्दु धर्मशास्त्र. प्र०.७ १८६४, यांत मुंबईच्या हायकोर्टानें असा ठराव केला कीं, विधवेला जें अन्नदस्त्र द्याव- याचें, र्ते तिच्या स्थितीप्रमाणे व ज्यांपासून तिला अन्नवस्त्र मिळावयाचे त्यांच्या स्थिती- प्रमाणें योग्य असून, तितक्याची नेमणूक तिला करून दिली पाहिजे. ती साधा- रण रीत्या पुत्राच्या वांट्याहून अधिक नसावी. आणि ही नेमणूक देणें ती नवऱ्याच्या मरणापासून जी चढलेली असेल, त्यासुद्धां देववावी. पूर्वी अशी चढलेली रक्कम देव- वीत नसत. तो ठराव या ठरावावरून निष्फल झाला आहे. . हल्ली मुदतींत असेल तितकी रकम मिळेल असें दिसतेंः ( इं. ला. रि. मुं. व्हा. ३ पृ. २०७, जीत्री वि. रामजी ). १० ( ३९३. ) विधवेच्या अन्नवस्त्राचा आकार करिते वेळी तिचें स्त्रीधन मनांत न आणितां त्याखेरीज तिच्या स्थितीप्रमाणे तिला योग्य नेमणूक करून द्यावी." आकारणी पुरता हा ठराव अद्यापि ग्राह्य व्हावा असे दिसतें. अन्नवस्त्राचा आकार करतांना मृताची स्थिति व दरजा, उत्पन्नाचें मान, विधवेची स्थिति व दरजा, धार्मिक व इतर कर्तव्ये ह्यांचा विचार केला पाहिजे.' १२ ( ३९४. ) दिराकडून भावजईला जे अन्नवस्त्र देविवर्णे ते तिच्या नवऱ्याकडून त्याला रिक्थ किती मिळाले आहे, अथवा वडिलार्जित इस्टेटीपैकी किती इस्टेट त्याच्या वांटणीस आली आहे, व तसे नसल्यास त्याचें उत्पन्न किती आहे या सर्वांचा विचार करून मग अन्नवस्त्राची नेमणूक करावी, असा बंगालच्या हायकोर्टाने ठराव केला आहे. व ही गोष्ट अन्यत्रही आतां कबूल करितात. (पाहा आपाजी चिंतामण वि. 93 १०. मुं. हा. रि. वा. १ पृ. १९४. याचप्रमाणे मद्रास हायकोर्टाचा ठराव स्पे. अ. नं. ४३३ सन १८६३ यांत झाला आहे; म. द्दा. रि. वा. २ पृ. ३६. याचविषयीं कलकत्ता स. दि. अ. चे निवडक रि. वा. ३ पृ. २२३ व वा. ४ पृ. ४२२ व अग्रा स. कोर्टाचे रि. सन १८६२ चे पृ. ९६ यांतील ठराव पहा, ११. मुं. हा. रि. वा. २ पृ. ३४१ स्पे. अ. नं. ७६९ स. १८६५. १२. बैसनी वि. रूपसिंह इं. ला. रि. १२ अ. ५५८. १३. सदर्लंड्स् वी. रि. वा. ६ पृ. २८५ स्पे. अ. नं. १६३९ सन १८६६. या कज्जांतील वि- धवा अविभक्त बंधूची स्त्री असावी असे वाटतें. सदरहू कज्जांतच असा ठराव झाला आहे की, अन्नवस्त्राबद्दल नेमणूक करून मागण्याचा हक शाबीत करण्याचा दावा स्मालकाज कोटाँत चालावयाचा नाहीं; ठरलेली नेमणूक जितकी चढली असेल, तितकी मागण्याचा दावा मात्र स्मालकाज कोर्टात होईल. ह्याचे कारण असे कीं, ही फिर्याद अथवा हा हक्क स्थावरावरच्या फिर्यादी अथवा हक्काप्रमाणे नाहीं. बीरचंद्र माणिक्य वि. राजकुमार इं. ला. रि. ९ क. ५३५. परंतु चढलेल्या रकमेबद्दलही स्मालकाज कोर्टात दावा आणतां येणार नाहीं असा प्रेसिडेन्सी स्मालकाज कोर्ट आक्ट १८८९ नववा ह्याखाली अलीकडे कलकत्त्यास ठराव झाला आहे. ( अमृतमयीदासी वि. भगीरथचंद्र-इं. ला. रि. १५ क. १६४. )