पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ७ पोषण आणि पोप्यवर्ग. २२३ ५ चारीपणाविषयी शंका आहे, तिलाही अन्नवस्त्र दिले पाहिजे असे दिसतें दुराचरणानें अनवस्त्राचा हक्क नष्ट होतो असा नवीन ठराव झाला आहे. हा नियम धर्मपत्नी नव्हे अशा स्त्रीपुरताच नाहीं हिला तर त्याने कोणत्याही तऱ्हेचें अन्नवस्त्र मिळणार नाहीं. पुन्हां सदाचरणानें प्राप्त होईल की काय ह्याबद्दल अद्यापि शंका आहे. तसेच मुलींना अन्नवस्त्र किती द्यावें हें वरील कलमांत सांगितलेच आहे. त्याचप्रमाणं अनंश पुरुषांच्या ज्या प्रतिकूल स्त्रिया असतील त्यांस त्यांच्या हयातीपर्यंत व त्यांच्या मुलींस त्याचे लग्न होईपर्यंत अन्नवस्त्र दिले पाहिजे. ६ ( ३९१.) एका विधवेने आपल्या सावत्र मुलावर अन्नवस्त्राची फिर्याद केली. तेव्हां त्यानें तकरार केली कीं, वादीनें बापाच्या इस्टेटींतून हिस्सा घेतला असून, शिवाय तिच्याजवळ स्त्रीधनही होतें; आणि ती माझे बापाचे मरणानंतर ३४ वर्षेपर्यंत व्याजवट्टा करून उदरनिर्वाह करीत होती, सवत्र तिची फिर्याद चालूं नये. या कामांत मुंत्र- ईच्या हायकोटीनें असा ठराव केला कीं, असें झार्ले तथापिही जर त्या विधवेस उपजी- विकेचे दुसरे साधन नसेल तर आपल्या नवऱ्याच्या वारसांपासून अन्नवस्त्र घेण्याचा तिला अधिकार आहे. परंतु आतां ह्या प्रकारचे ठराव अशास्त्र आहेत असे दुसरे ठराव झाले आहेत. अलीकडे एका सुनेने सासच्यावर अन्नवस्त्राची फिर्याद आणली. तिच्या नव- ज्यानें मृत्युपत्रानें तिला कांहीं दिलें होतें. असा ठराव झाला की, जर सासऱ्यावर तिच्या पोषणाचा बोजा असेल तर तिनें मृत्युपत्रांतली सोय करून घेतलीच पाहिजे असें नाहीं. सासऱ्यानें असें दाखविले पाहिजे की, तिच्या ताब्यांत तिचा निर्वाह होण्याजोगी स्वतंत्र इस्टेट आहे. नवऱ्याच्या मृत्युपत्रांत निर्दिष्ट केलेले अन्नवस्त्र ती मिळवूं शकेल एवढें पुरै होणार नाहीं. ती स्वतंत्रही राहू शकेल. तसा स्पष्ट उद्देश निर्दिष्ट नसेल तर मृत्युपत्रानें अन्नवस्त्राचा हक्क जात नाहीं व स्त्रीधन मिळणे व अन्नवस्त्राची तजवीज हीं सारखी नाहींत. घरांत राहिलेच पाहिजे अशी अंट नवरा मृत्युपत्रांत लिहील तर तर्से केले पाहिजे. अ . ( ३९२.) स्पे. अ. नं. १४८ सन १८६४, फडशा तारीख १२ जुलई सन ४. मि. भा. पृ. २२५. हुकुमनामा झाल्यानंतर दुराचरण झाले तरी निर्वाहापुरंत मिळतेंच: ( इं. ला. रि. १ मुं. ५५९). ५. रामनाथ वि. राजमणीदासी इं, ला. रि. १७ क. ६७४. ६. व्य. म. भा. भा. २ पृ. २१७. ७. स्पे अ. नंचर ३३ सन १८६३, मुं. हा. रि. वा. १ पृ. १३. हा ठराव पुढे बरोबर नाहीं असे ठरले आहे: पहा सावित्रीबाई वि. लक्ष्मीबाई, इं. ला. रि. २ मुं. पृ. ५७३; इं. ला. रि. २ मुं. ६३२; ७ मुं. १२७; ८ मुं. १५; ११ मुं. १९९. ८. गोकीचाई वि. लखमीदास खिमजी इं. ला. रि. १४ मुं. ४९०. इं. ला. रि. ३ मुं. ३७२. इं. ला. रि. ३ मुं. ४४ ह्यांत विरुद्ध ठराव होता. ४ मुं. २६१ पहा. ९. जयतारा वि. रामहरी सरदार इं. ला. रि. १० क ६३८. ९ अ. इं. ला, रि. १३ मुं. २१८. १५. मुं. २३६.