पोषण व पोष्य. २२५ गंगाबाई, इं. ला. रि. मुं. व्हा. २ पृ. ६३२ ) व अन्नवस्त्र मिळू शकेल. स्वतंत्र राहूनही मिळू शकेल.' १४ ( ३९५. ) नवरा व पुत्र यांखेरीज हा रिक्थाविषयीं नियम सर्वत्र लागू होईल असें दिसतें.' १५ न- ( ३९६. ) अ नें ब या विधवेला अन्नवस्त्राबद्दल दरमाहा अमुक नेमणूक द्यावी असा ठराव होता. पुढे ब च्या मयत नवऱ्याच्या वारशाच्या संबंधानें तिच्या नवऱ्याच्या कर्जाबद्दल अ चाच निवाडा तिच्या विरुद्ध झाला. त्यावरून तिची नेमणूक कमी कर- ण्याचा ठराव कनिष्ठ कोर्टानें केला. तो बंगालच्या हायकोर्टानें फिरवून ठरविलें कीं, ब ची नेमणूक फार थोडी आहे, व तिच्या स्थितीप्रमाणें तिच्या निर्वाहासही ती अवश्यक आहे, यास्तव अशा नेमणुकीवर नवन्याच्या कर्जाचा निवाडा बजावला जात नाहीं. वयाच्या कर्जाचा बोजा त्याच्या इस्टेटीवर प्रथमचा असून विधवेच्या पोषणाच्या बोजा- हून प्रबल आहे. परंतु विधवेच्या पोषणाची तजवीज पूर्वी झाली असल्यास, त्या द्रव्यावर नवण्याच्या धनकोचा हक्क चालेल असे वाटत नाहीं. नवऱ्याच्या मिळकतीवर विधवेचा पोषणा- च्या संबंधानें जो हक्क आहे, तो अशा प्रकारचा नाहीं की त्यामुळे तिच्या हक्काची माहिती नसून प्रामाणिक बुद्धीनें खरेदी घेणारांचे नुकसान होऊं शकेल, किंवा खरेदीदारावर त्या पोषणाचा बोजा पडेल: ' ७ ( पाहा. बं. ला. स्.ि वा. ८ पा. २२५, व लक्ष्मण वि. सरस्वतीबाई, मुं. हा. रि. व्हा. १२ पा. ६९ ) १७ ( ३९७.) बंगालचा कायदा ११ सन १७२६ चा याप्रमाणें कांहीं गुन्हे अ च्या मुलांनी केल्यावरून त्यांची वंशपरंपरेची व दुसरी मिळकत सरकारानें दंड घेतली. तथापि त्यांतील वंशपरंपरेच्या इस्टेटींतून अन्नवस्त्र मागण्याचा अच्या विधवेचा हक जात नाहीं असा प्रिव्ही कौन्सिलाने ठराव केला आहे. ' १८ १४. आधीबाई वि. करसननथू इं. ला. रि. ६१ मुं. १९९. १५. काशीबाईनें आपणास व आपल्या मुलास अन्नवस्त्र देववावें असा दावा आपल्या सासऱ्यावर आणिला. तो दोन्ही खालच्या कोर्टानीं देवविला. परंतु ते ठराव हायकोर्टाने फिरवून दावा रद्द केला, कारण ह्या कुटुंबाची मालमत्ता वंशपरंपरेची नसून प्रतिवादीनें स्वतः मिळविलेली होती. दुसरें अपील नं. ४६ स. १८८२ ता. १९ डिसेंबर १८८२. ( याशिवाय गंगाराम वि. सीताराम इं. ला. रि. १ अलाहाबाद पृ. १७०; स. वी. रि. व्हा १०, खेत्रामणी दासी वि. काशीनाथ दास पहा. ) १६. मार्शल्स रि. वा. १ पृ. २००. १७. पहा बं. ला. रि. वा. ८ पा. २२५; व लक्ष्मण रामचंद्र वि, सरस्वतीबाई, मुं. हा. रि. व्हा. १२ पा. ६९. १८. मूर्स इं. अपीलस् वा. ४ पृ. २४६. २९
पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२३२
Appearance