पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सातवें. पोषण आणि पोष्यवर्ग. ( ३८७.) जे रिक्थ घेतात त्यांस त्याबरोबर कांहीं कर्तव्यकर्माचें ओझें ध्यावें लागतें. तीं मुख्यत्वेंकरून तीन कृत्र्ये आहेतः एक कुटुंबाचें कर्ज फेडणें व त्याशिवाय जें देय असेल तें देणें; दुसरें, पुत्रांची उपनयनें किंवा कन्यांचे विवाह करणे व श्राद्धादि पितृकार्ये करणें; आणि तिसरें, जे पोप्य असतील त्यांस अन्नवस्त्र पुरविणें. यांतून दोहोंचें पूर्वी प्रसंगवशात् विवेचन झाले आहे. आतां, या प्रकरणांत पोष्य कोण व त्यांचें पोषण कोणीं करावें, व केव्हां करावें व ते कसे करावें, याचा विचार करूं. ( ३८८.) मनु असे सांगतो कीं, सुज्ञानें सर्वासही आमरणपर्यंत यथाशक्ति अ न्नाच्छादन द्यावें, हें न्याय्य होय. हा मूळ शास्त्रार्थ व याच्या आधारावरून जे जे पुरुष व ज्या ज्या स्त्रिया अनंश ठरल्या, त्यांचें रिक्थ घेणाऱ्यापासून अन्नवस्त्र घेण्याचे हक्क ठेवण्यांत आले आहेत असे दिसतें. ( ३८९. ) प्रथम विधवांविषयी विचार करूं. मयूखकार सांगतो' कीं, एकत्र झा लेल्या भावांतून कोणी निपुत्रिक मरेल, किंवा संन्याशी होईल, तर त्याचें धन इतर भा- वांनी वांटून घ्यावें (परंतु स्त्रीधनावांचून असेल तें); आणि त्यांच्या स्त्रियांचें मरणपर्यंत पो- पण करावें. स्त्रिया पतिव्रता नसल्यास अन्नाच्छादनही देऊं नये; आणि जी त्याची कन्या असेल तिर्चे पोषण विवाह होईपर्यंत तिच्या बापाच्या अंशांतून करून नंतर राहिलेला भाग भावानें ध्यावा. विवाहानंतर तिचें पोषण नवऱ्यानें करावें, अविभक्त भावाच्या बायकोला फक्त अन्नवस्त्राचा हक्क आहे. जेथें विधवेस हिस्सा मिळाला असेल तेथें तो अन्नवस्त्राऐवज घरावा. जेथें विभाग झाला असेल तेथें स्वतःच्या मुलाच्या भागा- वर बोजा पडतो. जेथें विभाग झाला नसेल तेथे सर्व इस्टेटीवर पडतो. अ ( ३९०. ) असें सांगितलें तथापि जी स्त्री कर्कशा आहे, ह्मणजे जिच्या व्यभि- १. व्य. म भा. भा. २ पृ. २०४. मुं. स. दि. अ. चे निवडक रि. सन १८२० पासून १८४० पर्यंत २. मंजाप्पा हेगडे वि. लक्ष्मी इं. ला. रि. १५ मुं. २३४. ३. हेमांगिनीदासी वि. केदारनाथ कुंडू इं, ला, रि. १६ क. ७५८.