पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शास्त्राचे उगम. १५ व्रतराजः–“ पूजामंत्रस्तु • अमृक्पानभयसंत्रस्तैः कृतात्वं होलिं बालिशैः । अतस्त्वां पुजयिष्यामि भूते भूतिप्रदा भव । इति होलिकानिर्णयः " । अर्थ:---पूजामंत्र असा आहे. हे होलि भीत मूर्ख लोकांनी रक्तपान करणारी अशी तुला केली आहे; ह्मणून मी तुझी पूजा करीन; आह्मांस समृद्धि दे.. हा होलिका निर्णय. वेंकनाथाच्या स्मृतिरत्नाकरांत अर्से सांगितलेलें आहेः--“यत्र शास्त्रगतिभिन्ना सर्वकर्मसु भारत । उदितेऽनुदिते चैव होमे भेदो यथा भवेत् ॥ तस्मात्कुंलक्रमायातमा चारं त्वाचरेद्बुधः १ सगरीयान्महावाहो सर्व शास्त्रोदितादपि. ॥” अर्थ:--यज्ञ सूर्योदयाच्या अगोदर करावा अथवा नंतर करावा ह्या- संबंधानें जसा मतभेद आहे त्याप्रमाणे जेथें शास्त्रनिदिष्ट गति, हे भारता, जेथें भिन्न आहे, तेथें कुलपरंपरागत आचार अनुसरावा. हे महाबाहो, सर्वशास्त्रकथित धर्मां- पेक्षां तो आचार प्रबल आहे. प्र० १

देवल ह्मणतो:--"आदौ तावत् देशधर्मो विचिन्त्यो देशेदेशेयास्थितिः सैवकार्या । लोकद्विष्टं पण्डितावर्जयन्तिदैवज्ञोऽतो लोकमार्गेण यायात् ॥ येषुदेशेषुयेदेवायेषु देशे- षु ये द्विजाः । येषु देशेषुयच्छौचं याश्चयत्रत्य मृत्तिकाः । येषुदेशेषुयत्तोयं धर्माचारश्चया- दृशः। तत्रतान्नावमन्येतं धर्मस्तत्रैवतादृशः ॥ " अर्थः -- पहिल्याने देशधर्माचा विचार [ आपल्या ] देशामध्ये जी चाल असेल तीच अनुसरावी; पण्डित लोकद्विष्ट गोष्टीचा त्याग करतात; शहाण्या मनुष्याने लोकस्वीकृत मार्गानें जावें; ज्या ज्या देशामध्ये जे जे देव, जे जे द्विज, जो जो शुद्ध आचार, ज्या ज्या मृत्तिका, जें जें जल, जो जो धर्माचार, त्यांचा तिरस्कार करूं नये; कारणं तो तो धर्माचार त्या त्या देशाचा कायदा आहे. W चतुर्विंशतिमतांतली सदाचाराची व्याख्याः- “ यस्मिन्देशेयआचारः पारम्पर्यक्रमा- गतः । वर्णानांकिलसर्वेषां स सदाचार उच्यते " ॥ अर्थः -- जो आचार ज्या देशामध्यें परम्परागत चालू आहे तो त्या देशांतील सर्व जातींचा सदाचार होय. १४ मत आहे. ( १०.) हा आचार व्यवहारांतही प्रसिद्ध असून बलिष्ठ आहे असे मनूसही अभि- शास्त्रानभिज्ञांचेही आचार ग्राह्य होतात. जसें होलिकापूजा वगैरे. व्रतराज पत्र ( १४६ पृ० १ ). ही गोष्ट सर्व हिंदुस्थानास लागू आहे. ( ११.) आतां मनु आदिकरून १८ ऋषींनी केलेल्या त्या स्मृति आणि जाचाली आदिकरून अठरा ऋषींनी केलेल्या त्या उपस्मृति असा विभाग सांगितला आहे. जसें स्मृतींचें प्रामाण्य मानिले आहे, तसेंच उपस्मृतीचेंही मानिले आहे. भविष्य- १४. मनु अध्या, २. श्लो० १८: यस्मिन्देशैयआचार: पारंपर्यक्रमागतः । वणीनांसांतरालानांससदा- चारउच्यते ॥