पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दायविभाग. २२१ ला. रि. अला. वा. १. पृ. ७३४. हा ठराव रूढीस विरुद्ध आहे. अयोध्या प्रांतामध्यें विधवेस सनदेर्ने मिळालेले स्थावर हें तिचें पुरें स्त्रीधन ठरले आणि ते तिच्या मुलांस मि- ळालें. ( ला. रि. इं. अ. वा. ९, पृ. १ ). नवयाच्या आतेच्या मुलाने दिलेले स्थावर है स्त्रीच्या नवऱ्यास न मिळतां भाऊ, आई व बाप यांस मिळावें असें ठरले. ( इं. ला. रि. क. वा. १ पृ. २७१ ). आजीस नातवाकडून मिळालेलें रिक्थ हें तिचें पारिभाषिक स्त्री- धन होत नाहीं. ( इं. ला. रि. अला. वा. १ पृ. ६६१ पहा. ). मुलीला बापाकडून मिळालेलें रिक्थ हें पारिभाषिक स्त्रीधन नसून, तिच्या मार्गे बापाचे वारिस हे त्या धनास वारिस होतात असें मिताक्षरेवरून बंगाल हायकोर्टानें • ठरविलें आहे: ( पहा इं. ला. रि. कल. पृ. ७४४; व प्रिव्ही कौंसिलानें मान्य केले आहे: ला. रि. इं. अ. वा. ८ पृ. ९९. या विरुद्ध हल्लीं मुंबईस ठरले आहे; रे. अ. फडशा ता. २० नोवेंबर १८७४; व याविषय इं. ला. रि. मुं. वा. ३ पृ. १७१ आणि इं. ला. रि. मुं. वा. ५ पृ, ६६० हें पहा. ). परंतु हा ठराव अप्रशस्त दिसतो. विवाहित स्त्रीनें स्वतः एकटीनें किंवा नवऱ्याच्या बरोवर मिळून दोघांनी करार केला असेल त्यासंबंधी तिच्यावरील निवाडा तिच्या स्त्रीधनावर बजावेल असे दिसतें: इं. ला. रि. मुं. वा. पृ. ३१८; व नरो- त्तम वि. नानका इं. ला. रि. मुं. वा. ६ पृ. ४७३. निहालचंद वि. बाईशिवा इं. ला. रि. मुं. वा. ६ पृ. ४७० यांत थोडा प्रकार निराळा आहे; ह्मणजे ती अविवाहित होती व त्यामुळे ती स्वतंत्र जबाबदार धरली गेली. फिर्यादीच्या वेळेस विवाह झाला तरी हर- कत नाहीं.