पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. दुष्काळ वगैरे ज्या गोष्टी घडल्या असतां स्त्रीधनाची विल्हेवाट करण्याची जी नवऱ्यास परवानगी आहे, तसा प्रसंग या कामी नसल्यामुळे, मद्रास सदर दिवाणी अदालतीनें वादीचा दावा देवविला. ३७ २२० ( ३८२.) एका विधवेस तिच्या बापापासून मिळालेली मालमिळकत तिच्या मर- णानंतर तिच्या बहिणीस मिळेल, तिच्या नवऱ्याच्या बहिणीस मिळणार नाहीं. या • न्यायानें नवयाच्या बहिणीच्या नातवांस एकीकडे ठेवून, तिच्या बहिणीच्या मुलींस देण्याचा ठराव झाला. ३८ ( ३८३.) व्यवहारमयूखाप्रमाणे एखाद्या विवाहित स्त्रीला तिहाइता दिलेली इस्टेट व तिनें स्वतः मिळविलेले द्रव्य ह्याचा वारसा ती पुरुष असती त्याप्रमाणे जातो; ह्मणजे सून मुलीच्या अगोदर येते, कारण ती गोत्रज सपिंड आहे. 3 ३९ ( ३८४. ) एक निपुत्रिक विधवा मेली. मरणाच्या वेळी तिजजवळ लग्नाचे वेळीं दिलेले दागिने व स्वतःच्या उत्पन्नांतून विकत घेतलेले एक घर इतकें होतें. तिच्या पाठीमागें एक विधवा सवत, वादी दुसऱ्या एका सवतीचा नातू, एक पुतण्या ह्म० दिराचा मुलगा इतके होते. तिचा विवाह पसंत केलेल्या चार विवाहांप्रमाणे झाला होता. हायकोर्टानें असें ठरविलें कीं, वादी तिचा वारस होतो, कारण तो तिचा सवतीपेक्षां अथवा पुतण्यापेक्षां जवळचा सपिंड आहे.' ४० ( ३८५.) स्त्रीपासून स्त्रीला मिळालेले स्त्रीधनाप्रमाणें जात नाहीं, ह्मणजे शेवटच्या ताबेदाराच्या वारसांकडे जातें: इं. ला. रि. क. २२५. मयूखाप्रमाणे तिच्याच वारसांकडे जातें. ४३ ( ३८५अ.) जेथें स्त्रीच्या धनाला स्त्री वारस होऊं मागते तेव्हां सदाचरण आवश्यक नाहीं.' ४२ ( ३८६.) नवऱ्यावरील निवाडा त्याच्या बायकोच्या आंगावरील दागिन्यांवर ( जर तें स्त्रीधन असतील तर ) बजाविला जाणार नाहीं: फक्त प्रसंगापुर्ते ते कदाचित नवरा घेऊं शकेलः तुकाराम वि. गुणाजी, मुं. हा. रि. वा. ८, ( अपी. दि.) पृ. १२९. स्त्रीला स्थावर बक्षीस दिलें तरी तिला त्यावर स्वतंत्र स्वत्व मिळत नाहीं असे ठरले आहे; इं. ३७. म. स. दि. अ. चे. रि. नं. ३१ सन १८५३ तारी. ५ नवेंबर सन १८५३ पृ. २५४. ३८. बा. रि. वा. १ पृ. ९१ ता. १४ फे. सन १८१४. ३९. बाई नर्मदा वि. भगवंतराय इं. ला. रि. १२ मुं. ५०५. ४०. गोजाबाई वि. श्रीमंत शहाजीराव भोंसले इं. ला. रि. १७ मुं. ११४. ४१. भास्कर वि. महादेव ६ मुं. हा. रि. अवल शा. १८; इं. ला. रि. ५क. २२५ पछा. ४२. गंगा. वि. घासिता इं. ला. रि. १ अ. ४६.