पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दाय विभाग. २१९ (३७८.) कोणी बायकोचें स्त्रीधन तिच्या मरणानंतर सामान्यतः तिचा नवरा, व नवरा नसल्यास त्याचे नजीकचे सपिंड, यांस मिळते. ३० 3 प्र० ६ 37 ३२ ( ३७९.) नवऱ्याने दिलेली जमीन कदाचित् खेरीज करून, बाकी सर्व प्रकारच्या स्त्रोधनाची व्यवस्था कोणी हिंदु विधवेने किंवा स्त्रियेनें पाहिजे त्या रीतीनें करावी; आणि शास्त्रांत सांगितलेल्या नियमित प्रसंगांखेरीज जे दागिने स्त्रीस विवाहामध्ये मिळा- ले असतील, ते नवरा घेऊं शकत नाहीं आणि त्यांचा व्यय करून जर कांही कुटुंबां- तील जमीन सोडविली असेल, तर तितका ऐवज तिला मिळाला पाहिजे. याप्रमाणें एका गृहस्थानें आपल्या मावजईपासून राहतें घर बांधण्याकरितां तिच्या स्त्रीधनांतून द्रव्य घेऊन तिला त्याऐवजीं कांहीं शेत विकत दिली. त्या विक्रीस मुलाचें अनुमोदन नव्हतें ह्मणून ती विक्री रद्द व्हावी अशी मुलाने तक्रार केली. त्यावरून मुंबईच्या हायकोर्टानें असा ठराव केला कीं, मुलाने चुलतीच्या स्त्रीधनांतून बांधिलेलें घर आपल्या कबजांत ठेविलें यावरून बापानें केलेली विक्री मान्य केली असे समजले पाहिजे. सबब चुलतीच्या स्त्रीधनांतून जीं घेतलेली शेतं, ती तिच्या ताब्यांत देवविलीं 3. पट्टिदारी गांवांत नवऱ्यानें बायकोस दिलेला भाग स्त्रीधन होऊं शकेल असें अलाहाबाद कोर्टानें ठरविले आहे. मयत भावापासून मिळालेली स्थावर इस्टेट स्त्रीधन होते. " ३४ ● ( ३८०. ) ब्राह्म इत्यादि विधींनी विवाह झाला असून स्त्री अनपत्य मरण पावें- ल तर तिचें स्त्रीधन नवयास मिळेल. परंतु आसुर इत्यादि तीन विधींनी झाला असल्यास आईबापांस मिळेल, असा मद्रास सदर अदालतीने ठराव केला आहे. ३४ ( ३८१.) एका नवऱ्यानें कांहीं कर्ज वारण्याकरितां आपल्या बायकोचें जवाहीर विकलें. त्याची किंमत आपणास मिळावी ह्मणून वादीनें दावा आणिला. त्यावरून, ३०. कलक. स. दि. अ. चे. रि. सन १८६० पृ. ६४१; पहा इं. ला. रि. मुं. वा. २, पृ. ९; मुं. हा. रि. वा. २, पृ. ६१; इं. ला. रि. १२ क. ३४८ पहा. बहिणीच्या मुलीच्या अगोदर दिराच्या मुलाला मिळाली. ३१. म. हा. रि. वा. १ पृ. ८५. ३२. मद्रास स. अ. चे रि. सन १८५३ चे पृ. २५४ ता. ५ नवेंबर १८५३. ३३. मुं. हा. रि. वा. २ पृ. ३१८, स्पे. अ. नं. ११३ सन १८६४; पहा वेंकट वि. वेंकट, इं. ला. रि. म. वा. १ पृ. २८३; व इं. ला. रि. म. वा. १ पृ. १६६. ३४. थाक्रो वि. गंगाप्रसाद इं. ला. रि. १० अ. १९७. ३५. मुनिया वि. पुरण इं. ला. रि. ५ अ. ३१०. ३६. स्पे. अ. नं. २० सन १८५२ ता. १२ मार्च सन १८५२ पृ. २३ : सदरहू महिन्याचे अंकाचें. विजरंगम वि. लक्ष्मण मुं. हा. रि. वा. ८ पृ. २४४ (अवल दि. शाखा ); जैकिसनदास वि. हरकिसनदास ई. ला. रि. मुं. वा. २ पृ. ९.