पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दीयविभाग. २१७ द्रव्य, हे सर्व माझ्या नवयानें घेऊन मला घालवून दिले. ते मला परत देववून अन्नवस्त्र देववावें. त्याप्रमाणे शाबिदी झाल्यावरून, आणि नवयाने तिजवर व्यभिचा- राचा आरोप आणिला तो नाशाचीत ठरून, वादीचा दावा देवविला. २२ ( ३७४.) बापानें मुलीस बक्षिस दिलेल्या मिळकतीवर तिच्या नवऱ्याच्या व पु त्राच्या कर्जदारांचा निवाडा बजाविला जाणार नाहीं; कारण ती त्या मिळकतीची पुरी मालक आहे, असा मुंबई सदर दिवाणी अदालतीनें स्पे. अ. नं. ३४७५ यांत ता. ८ जुलई सन १८५४ रोजीं ठराव केला आहे. तिला बापापासून वारश्यानें मिळालेली मि- ळकत स्त्रीधन होते व त्याप्रमाणे जाते. २३ २४ ( ३७५. ) स्पे. अ. नं. ६३३ सन १८६४ यांत मुंबईच्या हायकोर्टानें ता. १३ जानेवारी सन १८६५ रोजी असा ठराव केला आहे कीं, मुंबई इलाख्यामध्ये विवाहित स्त्रीस जे बापाचें स्थावर रिक्थ मिळते तें स्त्रीधनच होय. तें तिला मिळून ती मेल्यानं- तर तिच्या स्वतःच्या वारसांकडे जाते. २४ तिचा बाप वगैरे जे सप्रतिबंध दाय घेणारे दायाद यांस मिळत नाही. या ठरावास मुख्यत्वेंकरून आधार खाली लिहिलेली वचन सांगितलेली आहेत:- 66 ' बापानें, आईनें, नवयानें, आणि भावानें जें दिलें असेल तें; व जें अध्यग्नि ह्मणजे विवाहकालीं विवाहाग्निसमीप मामा वगैरेनीं• दिलेलें तें; आधिवेदनिक ह्मणजे दुसरे लग्न करितेसमय पहिल्या बायकोला दिलेलें तें; अधिविन्न स्त्रीला धन द्यावें, असे सांगि- तलें आहे तें, आणि इत्यादि ह्मणजे खुला दाय, क्रय, अटकावलेला दाय, अधिगम, परि- ग्रह, यासंबंधाने मिळालेले हे स्त्रीधन होय असे मन्वादि ऋपींनी सांगितले आहे. तसेंचः—“ मनुः––अध्यग्नि, अध्यावहनिक, प्रीतिदत्त, तसेच भाऊ, आई, बाप, यां- पासून मिळालेले अर्से सहा प्रकारचें स्त्रीधन सांगितलेले आहे. आतां, वरील वचनांत सहा प्रकारचें ह्मटलें ते प्रकार सहांपेक्षा कमी नाहीत असे समजण्यासाठी. तेणेंकरून पिता, माता, नवरा, भाऊ यांनी दिलेलें, व अध्यग्नि, तसेच अध्यावहनिक, इत्यादि स्त्री- धन सांगितलेलें आहे. "" २५१" याच वचनाचे उद्घाटन करिते समयीं मयूखकार वरील व्याख्या सांगून त्यावरून ह्मणतो कीं, या याज्ञवल्क्यवचनांतील इत्यादिक पदांचीही संगति लागते. " आणि २२. बी. रि. वा. २ पृ. ४४० ता. १४ फेब्रु. सन १८२३ नं. ८५. २३. मारिसचे रि. वा. १ पृ-४६-४७; हैं सौदायिक होय; यावर तिची पूर्ण मालकी आहे. पहा ई. ला. रि. म. वा. १ पृ. ३०७. २४, दलपत नरोत्तम वि. भगवान कुशल इं. ला. रि. ९ मुं. ३०१. २४ अ. नवीन ठराव मार्गे वारसप्रकरणांत दिलेले आहेतच, २५. मि. भा. पृ. २३८, २३९. २८